ACB Trap News | लाचलुचपत प्रतिबंधक विभाग : 1 लाखाची लाच घेणारा निरीक्षक अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

ठाणे : पोलीसनामा ऑनलाइन – ACB Trap News | 1 लाख 85 हजार रूपयाच्या लाचेची मागणी करून 1 लाख रूपयाची लाच घेणार्‍या अंबरनाथ नगरपरिषदेच्या (Ambernath Municipal Council) स्वच्छता निरीक्षकास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने (Anti Corruption Bureau Thane) रंगेहाथ पकडले आहेत (Thane ACB Trap). निरीक्षकाविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (ACB Trap News)

 

विलास बटया भोपी Vilas Bataya Bhopi (57, स्वच्छता निरीक्षक, अंबरनाथ नगरपरिषद, जि. ठाणे) असे लाच घेणार्‍याचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, तक्रारदार हे काम करत असलेल्या कंपनीचे सार्वजनिक शौचालय स्वच्छतेचे बिल मंजुर करून देण्यासाठी विलास भोपी (Vilas Bhopi In ACB Trap) यांनी 1 लाख 85 हजार रूपयांची लाच मागितली होती. तक्रारदाराची इच्छा नसल्याने त्यांनी अ‍ॅन्टी करप्शन विभागाकडे दि. 8 मे 2023 रोजी तक्रार नोंदविली. (ACB Trap News)

 

तक्रारीची पडताळणी केली असता विलास भोपी यांनी त्यावेळी 3 लाख 70 हजार रूपयांची मागणी केली. त्यापैकी पहिला हप्ता म्हणून 1 लाख 85 हजार रूप्ये मागितल्याचे निष्पन्न झाले. अ‍ॅन्टी करप्शनच्या पथकाने सापळा रचला असता त्यावेळी विलास भोपी यांनी सरकारी पंचासमक्ष तक्रारदार यांच्याकडून 1 लाख रूपयाची लाच घेतली. त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले. पोलिस निरीक्षक सुरेश चोपडे (PI Suresh Chopade) गुन्हयाचा अधिक तपास करीत आहेत. (Thane Crime News)

 

 

Web Title :- ACB Trap News | Anti-corruption department: Inspector who took bribe of 1 lakh in anti-corruption net

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Sasubai Jorat Marathi Movie | मल्टीस्टारर धमाल कॉमेडी “सासूबाई जोरात’२६ मे पासून संपूर्ण महाराष्ट्रात

Pune Crime News | पुणे क्राईम न्यूज : सहकारनगर पोलिस स्टेशन – वर्षभरापासुन फरारी असलेल्या आरोपीला अटक

Ajit Pawar | शरद पवारांच्या पत्रकार परिषदेला उपस्थित का नव्हता? प्रश्न विचारताच अजित पवार पत्रकारावर भडकले, म्हणाले – ‘ए…’

Narhari Zirwal | ‘आमदार अपात्रतेचं प्रकरण माझ्याकडे येऊ द्या, आमदारांना…’, कोर्टाच्या निकालाआधीच झिरवळ यांचं मोठं विधान

MLA Shashikant Shinde | ‘अजित पवार मुख्यमंत्री व्हावेत असं आम्हाला वाटतं, पण शरद पवार आणि…’, राष्ट्रवादीच्या आमदाराचे विधान