ACB Trap News | 10 हजार रुपये लाच स्वीकारताना सहायक पोलीस निरीक्षक (API) अँन्टी करप्शनच्या जाळ्यात

भंडारा : पोलीसनामा ऑनलाइन – गुन्ह्यातून मुलाचे नाव वगळण्यासाठी 15 हजार रुपये लाचेची मागणी करुन 10 हजार रुपये लाच स्वीकारताना (Accepting Bribe) भंडारा शहर पोलीस ठाण्यात (Bhandara City Police Station) कार्यरत असणाऱ्या सहायक पोलीस निरीक्षकास (API) लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB Trap News) अटक केली आहे. राजेश केशवराव साठवणे Rajesh Keshavrao Sathvane (वय 45, रा. हनुमान वॉर्ड तकीया रोड, भंडारा) असे लाच घेताना पकडण्यात आलेल्या एपीआयचे नाव आहे. एसीबीने (ACB Trap News) ही कारवाई गुरुवारी (दि.17) रात्री उशिरा केली.

तक्रारदार यांचा मुलगा व अन्य तीन इसमा विरुद्ध भंडारा शहर पोलीस ठाणे येथे विविध कलमान्वये गुन्हे (FIR) दाखल आहेत. यामुळे तक्रारदार यांच्या मुलाचे शैक्षणिक नुकसान होत आहे. या गुन्ह्यातून तक्रारदार यांच्या मुलाचे नाव वगळून दोषारोप पत्र (Charge Sheet) न्यायालयात दाखल करण्याच्या मोबदल्यात सहाय्यक पोलीस निरीक्षक साठवणे याने तक्रारदार यांच्याकडे 12 ऑगस्ट रोजी 15 हजार रुपयांची मागणी केली. तडजोडी अंती 10 हजार रुपये देण्याचे ठरले होते. (Bhandara ACB Trap News)

तक्रारदार यांना लाच देणे मान्य नसल्याने त्यांनी एसीबीकडे (ACB Trap News) याबाबत तक्रार केली. प्राप्त तक्रारीवरून गुरुवारी पडताळणी केली असता आरोपी साठवणे याने 10 हजार रुपये लाचेची पंचासमक्ष मागणी करून स्विकारण्याची तयारी दर्शवली. त्यावरून सापळा रचून तक्रारदार यांच्याकडून 10 हजार स्विकारताना आरोपी एपीआय राजेश साठवणे याला ताब्यात घेण्यात आले. या प्रकरणी भंडारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नागपूर परिक्षेत्र पोलीस अधीक्षक राहुल माकणीकर (SP Rahul Maknikar),
अपर पोलीस अधीक्षक सचिन कदम (Addl SP Sachin Kadam) यांच्या मार्गदर्शनात भंडारा एसीबीचे पोलीस उपअधीक्षक
डॉ अरुणकुमार लोहार (DySP Dr. Arun Kumar Lohar), पोलीस निरीक्षक कमलेश सोनटक्के (PI Kamlesh Sontakke),
पोलीस निरीक्षक अमित डहारे (PI Amit Dahare), पोलीस उपनिरीक्षक संजय कुंजरकर (PSI Sanjay Kunjarkar),
गोस्वामी, अतुल मेश्राम, मिथुन चांदेवार,चेतन पोटे,मयूर शिंगणजुडे, विवेक रणदिवे, राजकुमार लेंडे, अंकुश गाढवे,
विष्णू वरठी, राहुल, अभिलाषा गजभिये यांनी केली.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

RBI UDGAM Portal | बॅंकेमध्ये दावा न केलेली रक्कम आता एकाच वेबसाईटवर पाहता येणार; आरबीआयने केले खास पोर्टल लॉन्च

Pune Crime News | अंमली पदार्थाची तस्करी करणाऱ्या 4 जणांना गुन्हे शाखेकडून अटक; 46 लाखांचे एम.डी., कोकेन, चरस जप्त (Video)