ACB Trap News | 1500 रूपयाच्या लाच प्रकरणी कृषी सहाय्यक अॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

बीड : पोलीसनामा ऑनलाइन – ACB Trap News | बीड जिल्ह्यातील पाटोदा तालुक्यातील (Patoda Bribe Case) कृषी सहाय्यकास 1 हजार 500 रूपयाची लाच घेताना अॅन्टी करप्शनच्या पथकाने रंगेहाथ पकडले आहे (Beed ACB Trap). त्यांच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना अटक करण्यात आली आहे. (ACB Trap News)
कृष्णा महादेव आगलावे Krishna Mahadev Aglave (40, मुळ पद – कृषी सहाय्यक, अतिरिक्त पदभार – मंडळ कृषी अधिकारी पाटोदा क्रमांक 2, तालुका कृषी अधिकारी कार्यालय, पाटोदा, ता. पाटोदा, जि. बीड) असे लाच घेणार्याचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, तक्रारदार यांच्या नावे असलेल्या शेतामध्ये कांदाचाळ मंजूर झाली होती. तक्रारदार यांनी कांदा चाळीचे काम पुर्ण केले असून तक्रारदार यांना अनुदानाची रक्कम मिळण्यासाठी कांदा चाळीची पाहणी केलेला अहवाल व बिले अपलोड करण्यासाठी कृष्णा महादेव आगलावे यांनी लाचेची मागणी केली होती.
सरकारी पंचासमक्ष आगलावे यांनी 1 हजार 500 रूपयाची लाच घेतली. त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले.
त्यांच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना अटक करण्यात आली आहे.
छत्रपती संभाजीनगर परिक्षेत्राचे पोलिस अधीक्षक संदीप आटोळे (ACB SP Sandeep Atole),
अप्पर पोलिस अधीक्षक विशाल खांबे (Addl SP Vishal Khambe), पोलिस उप अधीक्षक शंकर शिंदे (DySP Shankar Shinde)
यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक रविंद्र परदेशी (Ravindra Pardeshi), पोलिस अंमलदार श्रीराम गिराम,
पोलिस भरत गारदे, पोलिस अमोल खरसाडे, पोलिस अविनाश गवळी यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.
Web Title : ACB Trap News | Beed ACB Arrest Krishna Mahadev Aglave In Bribe Case Patoda
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
हे देखील वाचा
- ACB Trap News | 3 हजाराच्या लाच प्रकरणी तहसील कार्यालयातील महसुल सहाय्यक अॅन्टी करप्शनच्या जाळ्यात
- Pune Congress – Vinod Solanki | काँग्रेस पक्षाच्या अल्पसंख्यांक महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षपदी विनोद सोळंकी यांची फेर निवड
- Gautami Patil | गौतमी पाटीलवरुन पुण्यातील राष्ट्रवादीचे आमदार आणि शिवसेनेच्या माजी खासदारामध्ये जुंपली