ACB Trap News | 1 हजाराची लाच घेताना महिला पोलिस हवालदार अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळयात

ठाणे : पोलीसनामा ऑनलाइन – ACB Trap News | प्रकरण पोलिस चौकीतच मिटवण्यासाठी (Settlement In Police Chowki) आणि प्रतिबंधात्मक कारवाई (Preventive Action) न करण्यासाठी 1500 रूपयाच्या लाचेची मागणी (Thane Bribe Case) करून 1 हजार रूपयाची लाच घेतल्याप्रकरणी अ‍ॅन्टी करप्शन विभागाच्या पथकाने (Anti Corruption Bureau Maharashtra) विरार पोलिस स्टेशनमधील (Virar Police Station) महिला पोलिस (Female Police) हवालदार समिक्षा संतोष मोहिते (Police Samiksha Santosh Mohite) यांना रंगेहाथ पकडले आहे. त्यांच्याविरूध्द गुन्हा First Information Report (FIR) दाखल करण्यात आला असून त्यांना अटक करण्यात आली आहे. (ACB Trap News)

याबाबत अधिक माहिती अशी की, तक्रारदार यांनी त्यांच्या भावाविरूध्द एक अदखलपात्र गुन्हा नोंदविला होता. मात्र, दोघा भावांमध्ये आपआपसात मिटले. त्यामुळे तक्रारदाराने पोलिस हवालदार समिक्षा संतोष मोहिते यांना आता कोणत्याही प्रकारची कारवाई करू नका अशी विनंती केली (Thane ACB Trap). त्यावेळी पोलिस हवालदार मोहिते यांनी तक्रारदारास प्रतिबंधात्मक कारवाई न करण्यासाठी आणि प्रकरण पोलिस चौकीत मिटविण्यासाठी 1500 रूपयाची लाच मागितली. तडजोडीअंती 1 हजार रूपयाची लाच घेण्याचे ठरले. (ACB Trap News)

तक्रारदाराची लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी लाचलचुपत प्रतिबंधक पथकाकडे तक्रार नोंदविली. प्राप्त तक्रारीची पडताळणी केली असता सरकारी पंचासमक्ष महिला पोलिस समिक्षा मोहिते यांनी 1 हजार रूपयाची लाच घेतली. त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले. त्यांच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना अटक करण्यात आली आहे. (Thane Crime News)

 

ठाणे परिक्षेत्राचे पोलिस अधीक्षक सुनिल लोखंडे (Thane ACB SP Sunil Lokhande), अप्पर पोलिस अधीक्षक अनिल घेरडीकर (Addl SP Anil Gherdikar), पोलिस उप अधीक्षक नवनाथ जगताप (DySP Navnath Jagtap), पोलिस निरीक्षक स्वपन बिश्वास (PI Swapan Biswas), पोलिस हवालदार अमित चव्हाण, पोलिस नितीन पागधरे, पोलिस नवनाथ भगत, पोलिस संजय सुतार, पोलिस विलास भोये, पोलिस योगेश धारणे, पोलिस दिपक सुमडा आणि महिला पोलिस नाईक स्वाती तारवी यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.

 

Web Title :  ACB Trap News | Female police constable in anti-corruption net while taking bribe of 1 thousand

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा