ACB Trap News | विद्यार्थीनीकडून लाच घेताना महिला प्राचार्य अँन्टी करप्शनच्या जाळ्यात, शिक्षण क्षेत्रात प्रचंड खळबळ

भंडारा : पोलीसनामा ऑनलाइन – हॉल तिकीट देण्यासाठी एक हजार रुपयांची लाच मागणाऱ्या (Accepting Bribe) महिला प्राचार्यासह अन्य एकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB Trap News) सापळा रचून अटक केली आहे. ही कारवाई सोमवारी (दि.17) भंडारा येथील महिला अध्यापक विद्यालयात (Women Teachers School Bhandara) करण्यात आली. एसीबीच्या (ACB Trap News) या कारवाईमुळे शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली आहे.

 

महिला अध्यापक विद्यालय प्राचार्य जयप्रभा मारबते Principal Jayaprabha Marbate (वय 57 रा. राणी लक्ष्मीबाई वार्ड, भंडारा) खाजगी इसम अक्षय तुलाराम मोहनकर Akshay Tularam Mohankar (वय -27 रा. मौलाना आझाद वार्ड, तुकडोजी पुतळ्याजवळ, भंडारा) असे लाच घेताना पकडण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. याबाबत विद्यालयात शिक्षण घेत असलेल्या एका 30 वर्षीय विद्यार्थीनीने भंडारा एसीबीकडे (ACB Trap News) तक्रार केली आहे.

 

यातील तक्रारदार या महिला अध्यापक विद्यालय येथे प्रथम वर्ष D.EL.Ed चे शिक्षण घेत आहे. प्रथम वर्षाची परीक्षा 20 जुलै पासून सुरु होणार आहे. D.EL.Ed प्रथम वर्षाच्या परीक्षेस बसण्यासाठीचे हॉल तिकिट (Hall Ticket) देण्याच्या मोबदल्यात प्राचार्य मारबते यांनी तक्रारदार यांना एक हजार रुपयांची मागणी केली. याबाबत महिलेने भंडारा एसीबीकडे (Bhandara ACB Trap News) तक्रार केली.

 

महिलेच्या तक्रारीवरून पडताळणी कारवाई दरम्यान पंचांसमक्ष प्राचार्य मारबते यांनी एक हजार रुपये, विकासनिधी व गैरहजरीचे 440 रुपये असे एकूण 1,440 रुपये लाच मागितल्याचे स्पष्ट झाले. ही रक्कम त्यांनी मोहनकर याला देण्यास सांगितले. यावरून मोहनकर याने पंचासमक्ष प्राचार्य मारबते यांच्या सांगण्यावरून लाचेची रक्कम स्वीकारली. त्यानंतर दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली. दोघांवर भंडारा शहर पोलीस ठाण्यात (Bhandara City Police Station) गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे.

 

ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नागपूर परिक्षेत्र, नागपूर,
पोलीस अधीक्षक राहुल माकणीकर (SP Rahul Maknikar),
अपर पोलीस अधीक्षक सचिन कदम (Addl SP Sachin Kadam)
यांच्या मार्गदर्शनाखाली भंडारा एसीबीचे पोलीस उपअधीक्षक डॉ अरुणकुमार लोहार
(DySP Dr. Arun Kumar Lohar), पोलीस निरीक्षक अमित डहारे (PI Amit Dahare),
पोलीस उपनिरीक्षक संजय कुंजरकर (PSI Sanjay Kunjarkar), पोलीस अंमलदार अतुल मेश्राम,
चेतन पोटे, मयूर शिंगणजुडे, विवेक रणदिवे, राजकुमार लेंडे, अंकुश गाढवे,
महिला पोलीस शिपाई अभिलाषा गजभिये यांच्या पथकाने केली.

 

Web Title : ACB Trap News | Female principal in anti-corruption net while taking bribe from students,
huge excitement in education sector

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा