ACB Trap News | महार वतनाच्या जमीन खरेदी विक्री प्रकरणात 6 बडया शासकीय अधिकाऱ्यांसह 38 जणांवर अ‍ॅन्टी करप्शनकडून FIR; अहमदनगरसह राज्यात खळबळ, जाणून घ्या गुन्हा दाखल करण्यात आलेल्याची नावे

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – ACB Trap News | महार वतन हाडोळा (Mahar Vatan Hadola) इनाम जमिनीचे बनावट कागदपत्रे (Forged Land Documents) तयार करुन या जिमिनीची खरेदी विक्री केल्याप्रकरणी अहमदनगरचे तत्कालीन अपर जिल्हाधिकारी (Former Addl Collector), प्रांत, तहसीलदार (Tehsildar), सहाय्यक दुय्यम निबंधक (Assistant Sub-Registrar), मंडळ अधिकारी (Circle Officer) तलाठ्यासह (Talathi) एकूण 38 जणांविरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB Trap News) गुन्हा (FIR) दाखल केला आहे. एसीबीच्या (ACB Trap News) या कारवाईमुळे अहमदनगर जिल्ह्यासह राज्यात खळबळ उडाली आहे.

नगर शहराजवळील वडगाव गुप्ता (Vadgaon Gupta) शिवारातील (गट क्रमांक 203 क्षेत्र 2 हेक्टर 97 आर) एक हेक्टर 34 आर ही कनिष्ठ महार वतन हाडोळा इनाम वर्ग 6 ची जमीन आहे. ती जुन्या शर्तीवर करण्यासाठी अटी व शर्तीवर तत्कालीन तहसीलदार यांनी बेकायदेशीर परवानगी दिली. त्यास तहसीलदार एन.एन. पाटील (Tehsildar N.N. Patil), तलाठी, एल.एस. रोहकले (Talathi, L.S. Rohkale), तत्कालीन मंडल अधिकारी दुर्गे (Mandal Adhikari Durge) यांनी मदत केली. तसेच जमिनीच्या खरेदी-विक्री व्यवहाराच्या नियमबाह्य फेरफार नोदी घेऊन उत्कर्ष पाटील (Utkarsh Patil) व अजित कड (Ajit Kad) यांना मदत केली. (ACB Trap News)

तत्कालीन अपर जिल्हाधिकारी व्ही.टी. जरे (Addl Collector V.T. Jare) व उपविभागीय अधिकारी राजेंद्र मुठे (Sub Divisional Officer Rajendra Muthe) यांना याचा आदेश बेकायदेशीर असल्याची माहिती होती. तरी देखील त्यांनी कुठलीही कारवाई केली नाही. तत्कालीन सहाय्यक दुय्यम निबंधक दिलीप बबन निराली (Assistant Second Registrar Dilip Baban Nirali) यांनी खरेदी-विक्रीचे बेकायदेशीर दस्त नोंदवून घेतेल्याचे तक्रारी अर्जात नमूद केले आहे.

ही जमीन महार वतन हाडोळा इनाम वर्ग 6 ब ची असल्याची माहिती असताना या सर्वांनी मिळून जमिनीचे खोटे कागदपत्र तयार केली. तसेच जमिनीच्या खरेदी-विक्रिचा व्यवहार करुन शासनाची फसवणूक (Fraud) केली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने तत्कालीन अतिरिक्त जिल्हाधिकारी यांच्यासह एकूण 38 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास एसीबीचे उपअधीक्षक प्रवीण लोखंडे (DySP Praveen Khande) करीत आहेत.

ACB Trap News

गुन्हा दाखल करण्यात आलेल्याची नावे

तत्कालीन तहसिलदार अहमदनगर एल.एन. पाटील, तत्कालीन तलाठी सजा वडगाव गुप्ता एल.एस. रोहकले, तत्कालीन मंडळ अधिकारी, नालेगाव ता.जि. नगर दुर्गे, तत्कालीन अपर जिल्हाधिकारी अहमदनगर व्ही. टी. जरे, तत्कालीन उपविभागीय अधिकारी नगर राजेंद्र मुठे, तत्कालीन सहाय्यक दुय्यम निबंधक अहमदनगर-2 दिलीप बबन निराली

जमिनीचे भोगवाटादार – दिनकर आनंदा शिंदे, विनायक शंकर शिंदे, बाबु आनंदराव शिंदे, मोहन आनंदराव शिंदे,
वामन किसन शिंदे, यादव किसन शिंदे, सदाशिव केशव शिंदे, रामभाऊ केशव शिंदे, सुनिल केशव शिंदे, यादव केशव शिंदे,
मालनबाई केशव शिंदे, लता शांतवण भाकरे, अरुण दगडु शिंदे, शालनबाई दगडु शिंदे, लक्ष्मण रामचंद्र शिंदे, मथुरा विष्णु शिंदे,
संदिप विष्णु शिंदे, सुनिता रतन गायकवाड, नंदा शाम घाटविसावे, शालुबाई शाहुराव प्रभुणे, मच्छिंद्र आनंदराव शिंदे,
लिलाबाई चंद्रभान पाडळे, शोभा बुद्धीराम ठाकुर

संमती देणारे – वत्सलाबाई तुकाराम पाचारणे, सुशिला शांतवण घाटविसावे, तुळसाबाई मारुती नरवडे,
छबुबाई भिवाजी साळवे, इंद्रायणी विठ्ठल जाधव, वत्सला वामन जाधव, कौसल्या दामु जगताप

जनरल मुखत्यार – उत्कर्ष सुरेश पाटील (रा. श्रमिकनगर, अहमदनगर) जमीन खरेदी करणारे अजित कचरदास लुंकड
(रा. आनंद दर्शन अपार्टमेंट, मार्केट यार्ड, अहमदनगर) यांच्यावर एमआयडीसी पोलीस स्टेशन (MIDC Police Station)
अहमदनगर येथे बुधवारी (दि. 19) भ्रष्टाचार प्रतिबंध कायदा (Prevention of Corruption Act), आयपीसी 167.
420, 109 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा घारगे-वालावलकर (SP Sharmistha Gharge-Walawalkar),
अपर पोलीस अधीक्षक माधव रेड्डी (Addl SP Madhav Reddy) पोलीस उपअधीक्षक नरेंद्र पवार
(DySP Narendra Pawar) यांच्या मार्गदर्शनाखाली अहमदनगर एसीबीचे (Ahmednagar ACB)
पोलीस उपअधीक्षक प्रविण लोखंडे, पोलीस निरीक्षक राजु आल्हाट (PI Raju Alhat), पोलीस अंमदार संतोष शिंदे,
रविंद्र निमसे, विजय गंगुले यांच्या पथकाने केली.

Pune Crime News | उत्तरप्रदेशात पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या खुनाच्या प्रयत्नातील आरोपीला भारती विद्यापीठ पोलिसांकडून अटक