
ACB Trap News | शिक्षकाकडून लाच घेताना गटशिक्षण अधिकारी अँन्टी करप्शनच्या जाळ्यात
चंद्रपूर : पोलीसनामा ऑनलाइन – ACB Trap News | वैद्यकीय रजा मंजूर करण्यासाठी 8 हजार रुपयांची लाच घेताना चंद्रपूर जिल्ह्यातील (Chandrapur ACB Bribe Case) सावली पंचायत समितीमधील गटशिक्षण अधिकाऱ्याला चंद्रपूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून रंगेहाथ पकडले. लोकनाथ जयराम खंडारे Loknath Jairam Khandare (वय 47) असे लाचखोर गटशिक्षण अधिकाऱ्याचे नाव आहे. एसबीच्या पथकाने ही कारवाई बुधवारी (दि.27) केली. (ACB Trap News)
याबाबत मूल ता. मूल येथील 50 वर्षीय शिक्षकाने चंद्रपूर एसीबीकडे तक्रार केली आहे. लोकनाथ खंडारे हे सावली पंचायत समितीमध्ये विस्तार अधिकारी (शिक्षण) असून त्यांच्याकडे गटशिक्षण अधिकारी म्हणून अतिरिक्त पदभार आहे. (ACB Trap News)
तक्रारदार हे मुल येथील रहिवासी असून प्राथमिक शिक्षक पदावर कार्यरत आहेत. तक्रारदार यांची सहा महिन्यांच्या वैद्यकीय रजा मंजूर नसल्याने त्यांनी रजा मंजुरी करीता पंचायत समिती सावली येथे अर्ज केला होता. तक्रारदार यांची वैद्यकीय रजा मंजूर करण्याचे काम करण्यासाठी लोकनाथ खंडारे यांनी तक्रारदार यांच्याकडे 10 हजार रुपये लाचेची मागणी करुन तडजोडी अंती 8 हजार रुपये लाच मागितली.
तक्रारदार यांनी याबाबत चंद्रपूर एसीबीकडे तक्रार केली. अधिकाऱ्यांनी 25 सप्टेंबर रोजी पडताळणी केली असता गटशिक्षण
अधिकारी लोकनाथ खंडारे यांनी तक्रारदार यांच्याकडे वैद्यकीय रजा मंजुर करण्यासाठी लाच मागितल्याचे निष्पन्न झाले.
त्यानुसार बुधवारी सापळा रचण्यात आला. तक्रारदार यांच्याकडून लाचेची रक्कम स्वीकारताना खंडारे यांना
रंगेहाथ पकडण्यात आले. त्यांच्यावर सावली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई नागपूर परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक राहुल माकणीकर, अपर पोलीस अधीक्षक संजय पुरंदरे
यांच्या मार्गदर्शनाखाली चंद्रपूर एसीबीचे पोलीस उप अधीक्षक मंजुषा भोसले, पोलीस अंमलदार हिवराज नेवारे,
रोशन चांदेकर, नरेशकुमार नन्नावरे, पुष्पा काचोळे, सतीश सिडाम यांच्या पथकाने केली.
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
हे देखील वाचा