ACB Trap News | NOC देण्यासाठी लाच घेताना आरोग्य विभागातील कर्मचाऱ्याला एसबीकडून अटक

ACB Trap News | ACB arrests Deputy Director of Directorate of Industrial Safety and Health for demanding bribe

जालना : पोलीसनामा ऑनलाइन – ACB Trap News | मेडिकल बील मंजूर केले नाही याबाबत NOC देण्यासाठी दोन हजार रुपये लाच स्वीकारताना जालना जिल्हा परिषद कार्यालयातील आरोग्य विभागाच्या सहाय्यकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून रंगेहाथ पकडले (Jalna ACB Bribe Case). रमेश रामधन राठोड Ramesh Ramdhan Rathod (वय-48) असे लाच घेताना पकडण्यात आलेल्या आरोग्य सहाय्यकाचे नाव आहे. जालना एसीबीच्या पथकाने ही कारवाई गुरुवारी (दि.14) सापळा रचून केली. (ACB Trap News)

याबाबत 44 वर्षाच्या व्यक्तीने जालना एसीबी कार्यालयात तक्रार केली आहे. तक्रारदार हे स्वतः आरोग्य विभागात नोकरी करतात. त्यांची बदली जिल्हा परिषद नांदेड येथे झालेली आहे. तक्रारदार यांनी 19 जानेवारी 2023 रोजी 29 हजार 362 व 61 हजार 859 असे एकूण 91 हजार 221 रूपयांची मेडिकल बिलाची फाईल आरोग्य विभागात दिलेली होती. त्यावेळी तक्रारदार यांचेकडून राठोड व सुधाकर मांटे यांनी 5 हजार रुपये घेतले होते. परंतु पैसे घेऊन पण मेडिकल बिल मंजूर केले नव्हते. या दरम्यान तक्रारदार यांची जिल्हा परिषद नांदेड येथे बदली झाली. (ACB Trap News)

तक्रारदार यांनी मेडिकल बिल मंजूर नाही याबाबत किमान NOC तरी द्यावी म्हणून 12 जुलै 2023 रोजी लेखी अर्ज केला होता. NOC देण्यासाठी रमेश राठोड याने तक्रारदार यांच्याकडे दोन हजार रुपयांची लाच मागितली. याबाबत तक्रारदार यांनी एसीबी कार्यालयात तक्रार केली. त्यानुसार पथकाने गुरुवारी पडताळणी केली. त्यावेळी NOC साठी रमेश राठोड याने कनिष्ठ सहाय्यक सरोज बिडला यांच्या नावाने दोन हजार रुपये लाचेची मागणी करून स्वीकारण्याचे मान्य केले. पथकाने सापळा रचून रमेश राठोड याला दोन हजार रुपये लाचेची रक्कम स्वीकारताना रंगेहाथ पकडले. रमेश राठोड याच्यावर कदिम जालना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक संदीप अटोळे, अपर पोलीस अधीक्षक विशाल खांबे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक किरण बिडवे पोलीस अमलदार गणेश बुजडे, गणेश चेके, शिवलिंग खुळे, अतिश तिडके, चालक कापसे यांच्या पथकाने केली.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

लोहगाव: अल्पवयीन मुलीची गळफास घेऊन आत्महत्या; छेडछाड करणार्‍याला अटक

पुणे ग्रामीण पोलीस दलाच्या पेट्रोल पंपावर 20 लाखांची फसवणूक

भीक मागण्यासाठी चक्क आपल्याच मुलीला विकले; देववाले समाजातील पंचासह १५ जणांवर गुन्हा दाखल

CSK ISquash Trophy’ 2023 Open National Championship Squash Tournament |
‘सीएसके आयस्क्वॉश करंडक’ २०२३ खुल्या राष्ट्रीय अजिंक्यपद स्क्वॉश स्पर्धेचे १५ सप्टेंबर पासून आयोजन

खडकी परिसरात दहशत माजवणाऱ्या शाहरुख उर्फ सुलतान बागवान टोळीवर ‘मोक्का’!
पोलिस आयुक्तांकडून आतापर्यंत 61 संघटित गुन्हेगारी टोळयांवर MCOCA

Total
0
Shares
Related Posts
Khadki Pune Crime News | Beat the driver and took the cab away! Two rickshaws, a car and a pedestrian were hit on the way

Pune Crime News | पुणे : धर्मांतराचा कट? ब्लेसिंग ऑईल, प्रभूची गाणी आणि डान्स करुन बरे होत असल्याचे सांगणाऱ्या पास्टर व सिस्टरवर जादुटोणा कायद्यान्वये गुन्हा दाखल

Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC) | Pimpri Municipal Corporation owes Rs 7 crore 55 lakh to the police; The topic of discussion in the city; Property on Lease for Police Station, Chowki with Commissionerate

Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC) | पिंपरी महापालिकेची पोलिसांकडे 7 कोटी 55 लाख रुपयांची थकबाकी; शहरात ठरतोय चर्चेचा विषय; आयुक्तालयासह पोलीस ठाणे, चौकीसाठी मालमत्ता भाडेतत्वावर