ACB Trap News | 25 हजाराच्या लाच प्रकरणी सहायक अधीक्षकासह तिघे अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

कोल्हापूर : पोलीसनामा ऑलनाइन – ACB Trap News | 30 हजार रूपयाच्या लाचेची मागणी करून 25 हजार रूपयाची लाच घेतल्याप्रकरणी कोल्हापूर (Kolhapur Bribe Case) येथील अ‍ॅन्टी करप्शनच्या पथकाने (Anti Corruption Bureau Maharashtra) सहाय्यक अधीक्षकासह तिघांविरूध्द गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, ग्रामीण रूग्णालयातील (Gramin Hospital Kolhapur) चालकासह एका खाजगी व्यक्तीस लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले आहे. (ACB Trap News)

 

मारूती परशुराम वरूटे Maruti Parshuram Varute (50, पद – सहायक अधीक्षक, उप संचालक कार्यालय, आरोग्य सेवा, कोल्हापूर. सध्या रा. प्लॉट नं. 4, सुनंदा पार्क, पोतदार हायस्कूल जवळ, कोल्हापूर. मुळ रा. कासारपुतळे, ता. राधानगरी, जि. कोल्हापूर), विलास जिवनराव शिंदे Vilas Jivanrao Shinde (57, चालक ग्रामीण रूग्णालय पारगाव, ता. हातकणंगले – Hatkanangale) आणि शिवम विलास शिंदे Shivam Vilas Shinde (22, रा. सरकारी हॉस्पीटल कॉलनी पारगाव, ता. हातकणंगले मुळ रा. किणी, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर) अशी लाच घेणार्‍यांची नावे आहेत. (ACB Trap News)

 

याबाबत अधिक माहिती अशी की, तक्रारदार यांचे सेवानिवृत्ती नंतर रजा रोखीकरण प्रस्ताव विना त्रुटी मंजूर करतो म्हणून आरोपी क्र. 1 यांनी तक्रारदार यांचेकडे 30 हजार रूपयाच्या लाचेची मागणी केली (Kolhapur ACB Trap). तडजोडीअंती 25 हजार रूपयाची लाच विलास जिवनराव शिंदे यांना घेण्यास सांगितली. त्यानंतर विलास शिंदे आणि शिवम विलास शिंदे लाच घेण्यासाठी गेले असता विलास शिंदे यांनी लाच घेतली. विलास शिंदे आणि शिवम शिंदे यांना रंगेहाथ पकडण्यात आले. (Kolhapur Crime News)

Advt.

पुणे परिक्षेत्राचे पोलिस अधीक्षक अमोल तांबे (Pune ACB SP Amol Tambe), अप्पर पोलिस अधीक्षक विजय चौधरी (Addl SP Vijay Chaudhary) यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उप अधीक्षक सरदार नाळे (DySP Sardar Nale),
पोलिस हवालदार विकास माने, पोलिस हवालदार सुनिल घोसाळकर, पोलिस अंमलदार रूपेश माने,
पोलिस अंमलदार मयुर देसाई, चालक पोलिस विष्णु गुरव यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.

 

Web Title :  ACB Trap News | Kolhapur Hatkanangale ACB Trap Bribe Case Maruti Parshuram Varute

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा