ACB Trap News | Anti Corruption Bureau : महिला शिक्षणाधिकारी 50 हजाराची लाच घेताना अँन्टी करप्शनच्या जाळ्यात

नाशिक : पोलीसनामा ऑनलाइन – ACB Trap News | नाशिक महानगरपालिकेच्या (Nashik Municipal Corporation) शिक्षणाधिकारी सुनीता धनगर यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (Anti Corruption Bureau) लाच घेताना (Accepting Bribe) अटक केली आहे. धनगर यांना 50 हजार रुपये लाच स्वीकारताना नाशिक एसीबीच्या (Nashik ACB) पथकाने रंगेहाथ पकडले. सुनीता धनगर यांच्यासह एका मनपा कर्मचाऱ्याला 5 हजार रुपये लाच घेताना (ACB Trap News) एसीबीने ताब्यात घेतले आहे. एसीबीच्या या कारवाईमुळे नाशिक मनपात खळबळ उडाली आहे.

शिक्षणाधिकारी (Education Officer) सुनिता सुभाष धनगर Sunita Subhash Dhangar (वय- 57 रा. 801 रचित सनशाइन उंटवाडी, नाशिक), मनपा कर्मचारी नितीन अनिल जोशी Nitin Anil Joshi (वय- 45 रा. फ्लॅट नंबर 8, पुष्पांकुर अपार्टमेंट, चव्हाण नगर, तपोवन, नाशिक) यांना लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले आहे. याबाबत एका 50 वर्षाच्या मुख्याध्यापकाने नाशिक एसीबीकडे (ACB Trap News) तक्रार केली आहे.

तक्रारदार हे एका शैक्षणिक संस्थेमध्ये मुख्याध्यापक पदावर कार्यरत होते. त्यांना सदरील संस्थेने बडतर्फ केले आहे. त्याकामी त्यांनी शैक्षणिक न्यायाधिकरण नाशिक (Education Tribunal, Nashik) येथे दाद मागितल्याने त्यांच्यावरी बडतर्फीच्या कारवाईस स्थगिती देण्यात आली होती. तरी देखील सदरील संस्था तक्रारदार यांना सेवेत दाखल करुन घेत नव्हती.

तक्रारदार यांनी मनपा शिक्षणाधिकारी सुनीता धनगर यांच्याकडे सदरील संस्थेवर कारवाई करण्यासाठी अर्ज केला होता. त्यासाठी सुनीता धनगर यांनी याबाबत पत्र देण्यासाठी 50 हजार रुपयाची लाच मागितली. मात्र, तक्रारदार यांना लाच देणे मान्य नसल्याने त्यांनी नाशिक एसीबीकडे तक्रार केली. त्यानुसार पथकाने पडताळणी करुन सापळा रचला. सुनीता धनगर यांना तक्रारदार यांच्याकडून 50 हजार रुपये लाच घेताना रंगेहाथ पकडले. तर मनपा कर्मचारी नितीन जोशी यांनी सदर पत्र बनवण्याच्या मोबदल्यात 5 हजार रुपये लाच स्वीकारली.

 

ही कारवाई पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा घारगे-वालावलकर (SP Sharmistha Gharge-Walawalkar),
पोलीस उपअधीक्षक नरेंद्र पवार (DySP Narendra Pawar)
यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संदीप घुगे (PI Sandeep Ghuge),
पोलीस निरीक्षक गायत्री जाधव (PI Gayatri Jadhav) पोलीस अंमलदार एकनाथ बाविस्कर,
प्रकाश महाजन, नितीन नेटारे यांच्या पथकाने केली

 

Web Title :  ACB Trap News | nashik municipal education officer sunita dhangar arrested
for taking bribe of fifty thousand

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा