GST निरीक्षक, ऑडीटर लाच घेताना अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – GST कार्यालयातील निरीक्षक व ऑडिटरला लाचेची मागणी करून ती स्विकारताना रंगेहाथ पकडले. नगरच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली.

विशाल सुखदेव भोर (वय 34 वर्षे, राज्यकर निरीक्षक, वर्ग 2, वस्तू व सेवाकर विभाग, अहमदनगर. रा:- साईनगर, भूषण नगर, केडगाव, अहमदनगर), निलेश म्हातारबा बांगर, वय 28 वर्ष, कर सल्लागार (खाजगी व्यवसाय, रा:- रानमळा, बेल्हे, ता:- जुन्नर, जि:- पुणे) ही अटक केलेल्यांची नावे आहेत.

याबाबत माहिती अशी की, तक्रारदार यांचे कृषी सेवा केंद्राचे GST खाते काढलेले होते. परंतु मागील दोन वर्षापासून त्यांचा व्यवसाय बंद होता. त्यांना आकारण्यात आलेला दंड रु 1, 13, 000/- न भरता त्यांचे GST खाते बंद करण्यासाठी कर निरीक्षकाने काल पंचासमक्ष 20 हजार रुपयांची मागणी केली. तडजोडीनंतर 15 हजार लाचेची मागणी करून ती रक्कम स्विकारण्याचे मान्य केले. सदर लाचेची रक्कम कर सल्लागार बांगर याच्याकडे देण्यास सांगितले. बेल्हे, ता. जुन्नर येथील बांगर असोशिएटस या कार्यालयात आज 15 हजार पंचासमक्ष स्विकारताना त्यांना रंगेहाथ पकडले आहे. कर निरीक्षकास GST कार्यालय येथून ताब्यात घेतले आहे.

फेसबुक पेज लाईक करा –