ACB Trap News | 40 हजार रुपये लाच घेताना पोलिसाला अ‍ॅन्टी करप्शनकडून अटक

ACB Trap News | Police arrested by anti-corruption while accepting bribe of 40 thousand rupees
File Photo

सोलापूर : पोलीसनामा ऑनलाइन – ACB Trap News | गुन्ह्यात अटक करुन तात्काळ जामीनावर सोडण्यासाठी 40 हजार रुपये लाच घेताना (Accepting Bribe) पोलीस हवालदाराला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (Anti Corruption Bureau (ACB) Maharashtra) रंगेहाथ पकडले. सोलापूर एसीबीच्या (Solapur ACB) पथकाने ही कारवाई मंगळवारी (दि.16) केली. हर्षवर्धन हरिश्चंद्र वाघमोडे (Harshvardhan Harishchandra Waghmode) असे अटक (ACB Trap News) करण्यात आलेल्या पोलीस हवालदाराचे नाव असून बार्शी शहर पोलीस ठाण्यात (Barshi City Police Station) गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत तक्रारदार यांनी सोलापूर एसीबीकडे (ACB Trap News) तक्रार केली आहे. पोलीस हवालदार (Police Constable) हर्षवर्धन वाघमोडे हे बार्शी शहर पोलीस ठाण्यात कार्यरत आहेत. तक्रारदार व त्यांच्या नातेवाईकांवर पोलीस ठाण्यात आयपीसी 143, 147, 148, 149, 324, 327, 504, 506 नुसार गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यात अटक (Arrest) करुन तात्काळ जामीनावर सुटका करुन देण्यासाठी वाघमोडे यांनी 50 हजार रुपये लाच मागितली. तडजोडी अंती 40 हजार रुपये देण्याचे ठरले. दरम्यान, तक्रारदार यांनी सोलापूर एसीबीकडे तक्रार केली. एसीबीच्या पथकाने पडताळणी केली असता वाघमोडे यांनी लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार मंगळवारी सापळा रचण्यात आला. तक्रारदार यांच्याकडून लाचेची रक्कम घेताना वाघमोडे यांना रंगेहाथ पकडण्यात आले.

 

 

ही कारवाई पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक अमोल तांबे (SP Amol Tambe),
अपर पोलीस अधीक्षक सुरज गुरव (Addl SP Suraj Gurav) यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक गणेश कुंभार
(DySP Ganesh Kumhar), पोलीस निरीक्षक उमाकांत महाडिक (Umakant Mahadik),
पोलीस अंमलदार स्वामीराव जाधव, अतुल घाडगे, राजू पवार, रशिद शेख यांच्या पथकाने केली.

 

 

 

Web Title : ACB Trap News | Police arrested by anti-corruption while accepting bribe of 40 thousand rupees

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Total
0
Shares
Related Posts
Amravati Assembly Constituency | mla sulbha khodke suspended from congress for six years for doing anti party activities she likely to join ajit pawar ncp

Amravati Assembly Constituency | पक्षविरोधी कारवाया केल्याचा ठपका ठेवत काँग्रेसमधून सहा वर्षांसाठी निलंबन; आता सुलभा खोडके अजित पवारांच्या राष्ट्रवादीतून निवडणूक लढविण्याच्या तयारीत

Sayaji Shinde On Sushma Andhare | sushma andhare criticism on ncp ajit pawar entry and now the sayaji shinde counterattack

Sayaji Shinde On Sushma Andhare | ‘सयाजी शिंदेंनी गुलीगत धोका दिला’, राष्ट्रवादीच्या प्रवेशावर सुषमा अंधारेंचा निशाणा; शिंदेंचा पलटवार; म्हणाले – ‘मी सुषमा अंधारे यांना विचारून निर्णय घेत नाही’