ACB Trap News | 3 हजाराची लाच घेताना पोलिस अधिकारी अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

नाशिक : पोलीसनामा ऑनलाइन – ACB Trap News | येवला तालुका पोलिस ठाण्याचे (Yeola Taluka Police Station) सहायक पोलीस उपनिरीक्षक विजय नारायण शिंदे ASI Vijay Narayan Shinde (वय, 51) यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (ACB Trap News) पथकाने रंगेहात पकडले आहे (Nashik Bribe Case). पोलीस कारवाईत मदत करण्याच्या मोबदल्यात 4 हजार रुपयांची मागणी करून त्यातील 3 हजार रुपयांचा पहिला हप्ता स्वीकारताना विजय शिंदे एसीबीच्या जाळ्यात सापडले. या घटनेने नाशिक पोलिस (Nashik Rural Police) दलात खळबळ उडाली आहे. (Nashik ACB Trap News)

याबाबत माहिती अशी, की तक्रारदाराच्या पत्नीने येवला तालुका पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून समोरील व्यक्तीवर कारवाई करण्यासाठी तसेच तक्रारादाराविरुध्द दाखल अदखलपात्र गुन्हा आणि तक्रार अर्जावरून दखलपात्र गुन्हा दाखल न करण्याच्या मोबदल्यात बक्षिस म्हणून सहायक उपनिरीक्षक विजय शिंदे यांनी 4 हजार रुपयांची लाच मागितली होती. याबाबत तक्रार प्राप्त झाल्यानंतर एसीबी पथकाने सापळा रचला. लाचेच्या रकमेपैकी 3 हजार रुपयांचा पहिला हप्ता स्वीकारताना पथकाने शिंदेला पंचासमक्ष पकडले. (Nashik Crime News)

नाशिक परिक्षेत्राच्या पोलिस अधीक्षक शर्मिष्ठा घारगे-वालावलकर (SP Sharmistha Gharge-Walawalkar),
पोलिस उप अधीक्षक नरेंद्र पवार (DySP Narendra Pawar) यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई
पोलीस उपअधीक्षक वैशाली पाटील (DySP Vaishali Patil), पोलीस नाईक राजेश गिते (Police Naik Rajesh Gite),
शरद हेंबाडे (Sharad Hembade), अनिल राठोड (Anil Rathod) यांनी केली आहे.

Web Title : ACB Trap News | Police officer caught in anti-corruption net while taking bribe of 3 thousand

Advt.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Maharashtra Weather Update | मॉन्सून पुन्हा लांबणीवर; महाराष्ट्रात 16 जूनपर्यंत पावसाची शक्यता

Pune Gold Rate Today | सोन्या-चांदीचे दर पुन्हा वधारले; जाणून घ्या आजचा भाव

Pune Crime News | पुणे क्राईम न्यूज : लोणी काळभोर पोलिस स्टेशन – अपघातामुळे बनावट नंबर प्लेट लावून फिरणारा कारचालक सापडला