रत्नागिरी : पोलीसनामा ऑनलाइन – ACB Trap News | खेड तहसीलदार कार्यालयात सुरु असलेली चाप्टर केस मिटवून देतो असे सांगून 3 हजार रुपये लाच स्वीकारताना (Accepting Bribe) महसूल सहाय्यक चंपलाल महाजन डेढवाल याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले. ही कारवाई गुरवारी (दि.11) करण्यात आली. (ACB Trap News)
याबाबत 52 वर्षीय व्यक्तीने रत्नागिरी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे (Anti Corruption Bureau Ratnagiri) तक्रार केली आहे. तक्रारदार व त्यांच्या सहकाऱ्यां विरुद्ध खेड तहसीलदार कार्यालयात सुरू असलेली चाप्टर केस मिटवून देतो, असे सांगून चंपलाल डेढवाल याने २८ डिसेंबर २०२३ रोजी तीन हजार रुपये लाचेची मागणी केली. तक्रारदार यांना लाच देणे मान्य नसल्याने त्यांनी एसबीकडे तक्रार केली.
एसीबीच्या पथकाने पडताळणी केली असता महसूल सहाय्यक डेढवाल याने तक्रारदार यांच्याकडे तीन हजार रुपये लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार पथकाने गुरुवारी सापळा रचला. तक्रारदार यांच्याकडून लाचेची रक्कम स्वीकारताना डेढवाल याला रंगेहात पकडण्यात आले. आरोपी चंपलाल डेढवाल याला ताब्यात घेण्यात आले आहे.
ही कारवाई ठाणे परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक सुनिल लोखंडे, अप्पर पोलीस अधीक्षक अनिल घेरडीकर,
अप्पर पोलीस अधीक्षक सुधाकर सुराडकर यांच्या मार्गदर्शनाखाली रत्नागिरी एसीबीचे पोलीस उपाधीक्षक सुशांत चव्हाण,
पोलीस निरीक्षक शहानवाज मुल्ला, पोलीस अंमलदार संतोष कोळेकर, विशाल नलावडे, दिपक आंबेकर, हेमंत पवार
यांच्या पथकाने केली.
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
हे देखील वाचा
सराईत दुचाकी चोरट्याला चाकण पोलिसांकडून अटक, 12 दुचाकी जप्त
बेकायदेशीर वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशी नागरिकाला महाळुंगे पोलिसांकडून अटक