ACB Trap News | 1 लाखाची लाच घेताना सरपंच पतीला अ‍ॅन्टी करप्शनकडून अटक

उस्मानाबाद : पोलीसनामा ऑनलाइन – ACB Trap News | दीड लाख रूपये किंवा सोलरच्या तीन प्लेट व त्याचे साहित्याच्या लाचेची मागणी करून 1 लाख रूपयाची लाच घेताना सरपंच पतीला उस्मानाबाद अ‍ॅन्टी करप्शनच्या पथकाने (Osmanabad ACB Bribe Case) अटक केली आहे. (ACB Trap News)

हनुमंत पांडुरंग कोलते (43, सरपंच पती, रा. रोहकल, ता. परांडा, जि. उस्मानाबाद) असे अटक केलेल्याचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, तक्रारदार हे मनेकर एनर्जी प्रा. लि. कंपनीमध्ये साईट सुपर वायझर म्हणून नेमणूकीस आहेत. कंपनीचे जल जीवन मिशन अंतर्गत सौर उर्जेवर आधारित दुहेरी पंप लघुनळ योजनेचे 18 लाख रूपये किंमतीचे काम रोहकल (ता. परांडा) येथील 3 वस्तीवर चालू आहे. आरोपी हनुमंत पांडुरंग कोलते (सरपंच पती) याने सदरील योजनेचे काम थांबवून ते पूर्ववत चालू करून देण्यासाठी तक्रारदाराकडे दि. 22 रोजी चालू असलेल्या तिन्ही कामाचे प्रत्येकी 50 हजार रूपये प्रमाणे दीड लाख रूपये किंवा सोलरच्या तीन प्लेट व त्याचे साहित्य अशी लाचेची मागणी केली. पंचासमक्ष तडजोडीअंती एक लाख रूपये घेण्याचे मान्य केले. (ACB Trap News)

दि. 23 मार्च रोजी पंचासमक्ष हनुमंत पांडुरंग कोलते याने उस्मानाबाद येथील जिल्हा परिषदेच्या
(Osmanabad ZP) कॅन्टीनमध्ये लाचेची रक्कम घेतली. त्यानंतर त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे.
औरंगाबाद (Aurangabad) परिक्षेत्राचे पोलिस अधीक्षक संदीप आटोळे (SP Sandeep Atole),
अप्पर अधीक्षक विशाल खांबे (Addl SP Vishal Khambe) यांच्या मार्गदर्शनाखाली
पोलिस उपाधीक्षक सिध्दाराम म्हेत्रे, पोलिस अमलदार दिनकर उगलमुगले, इफ्तेकार शेख, सचिन शेवाळे,
विष्णू बेळे आणि सिध्देश्वर तावसकर यांच्या पथकाने ही कारवाई केली.

Web Title :-  ACB Trap News | Sarpanch’s husband arrested by anti-corruption while accepting bribe of 1 lakh

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Ahmadnagar Accident News | देवदर्शन करून परतणाऱ्या भाविकांच्या गाडीचा भीषण अपघात; 4 ठार तर 11 जखमी

Chandrapur Crime News | खळबळजनक ! पहाटेच्या सुमारास मंदिरात दर्शनासाठी गेलेल्या भाविकांना आढळले दोघांचे मृतदेह