ACB Trap News | 2000 रुपये लाच घेताना येवला पंचायत समितीच्या शिक्षण विभागातील वरिष्ठ लिपीकाला एसीबीकडून अटक

नाशिक : पोलीसनामा ऑनलाइन – नाशिक जिल्ह्यातील शिक्षण विभागासह इतर शासकीय कार्यालयातील लाच खोरीच्या घटना समोर येत आहेत. त्यातच शुक्रवारी पंचायत समितीतील शिक्षण विभागात एक लाचखोर लिपिकाला लाच घेताना (Accepting Bribe) लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB Trap News) सापळा रचून पकडले. संजय रामदास पाटील (Sanjay Ramdas Patil) असे लाच घेताना पकडण्यात आलेल्या वरिष्ठ लिपीकाचे नाव आहे. नाशिक एसीबीच्या पथकाने (ACB Trap News) ही कारवाई येवला पोस्ट ऑफिस ( Yeola Post Office) समोर केली.

 

संजय पाटील हे पंचायत समिती येवला येथे शिक्षण विभागात वरिष्ठ लिपिक म्हणून काम करतात. तक्रारदार हे उपशिक्षक असून त्यांची व त्यांच्या पत्नीचे अंतीम वेतन देयक तयार करुन देण्यासाठी संजय पाटील याने दोन हजार रुपये लाचेची मागणी केली. तक्रारदार यांनी याबाबत नाशिक एसीबीकडे (ACB Trap News) तक्रार केली. पथकाने पडताळणी केली असता पाटील याने दोन हजार रुपये लाच मागित्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार शुक्रवारी येवला पोस्ट ऑफिससमोर सापळा रचण्यात आला. तक्रारदार यांच्याकडून दोन हजार रुपये लाच स्वीकारताना संजय पाटील यांना रंगेहाथ पकडण्यात आले.

ही कारवाई नाशिक परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा घारगे-वालावलकर
(SP Sharmishtha Gharge-Walawalkar), अपर पोलीस अधीक्षक माधव रेड्डी
(Addl SP Madhav Reddy) यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक एसीबीच्या पथकाने केली.
पुढील तपास पोलीस निरीक्षक साधना भोये-बेलगावकर (PI Sadhana Bhoye-Belgaonkar) करीत आहेत.

 

Web Title : ACB Trap News | Senior Clerk of Education Department of Yeola Panchayat Samiti arrested by ACB while accepting Rs 2000 bribe

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा