ACB Trap News | वाशी (जि. धाराशिव) भूमी अभिलेख कार्यालयातील एकास 15 हजाराची लाच घेताना अ‍ॅन्टी करप्शनकडून अटक

धाराशिव : पोलीसनामा ऑनलाइन – ACB Trap News | वाशी येथील भूमी अभिलेख कार्यालयातील (Bhumi Abhilekh Office Vashi) परिरक्षण भुमापकास (निमतानदार) 20 हजार रूपयाच्या लाचेची मागणी करून 15 हजार रूपयाची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने (Anti Corruption Bureau (ACB) Maharashtra) रंगेहाथ पकडले आहे (Dharashiv ACB Trap). त्यांच्याविरूध्द वाशी पोलिस स्टेशनमध्ये (Vashi Police Station Dharashiv) गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना अटक करण्यात आली आहे. (ACB Trap News)

सुनील श्रीराम रामदासी Sunil Shriram Ramdasi (55, परिरक्षण भुमापक (निमतानदार), भूमी अभिलेख कार्यालय वाशी, जि. धाराशिव) असे लाच घेणार्‍याचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, तक्रारदार यांनी त्यांच्या नावाने असलेल्या जमिनीची अकृषिक अतितातडीची मोजणी करण्यासाठी भूमी अभिलेख कार्यालयात अर्ज केला होता. त्यासाठी त्यांनी स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये State Bank Of India (SBI) चलन देखील भरले होते. तक्रारदार यांच्या जमिनीच्या मोजणीसाठी नोटीस काढून त्यांच्या जमिनीची अतितातडीची मोजणी करून देण्यासाठी सुनील श्रीराम रामदासी यांनी तक्रारदाराकडे सरकारी पंचासमक्ष 20 हजार रूपयाच्या लाचेची मागणी केली. (ACB Trap News)

तडजोडीअंती 15 हजार रूपयाची लाच घेण्याचे ठरले. पंचासमक्ष सुनील रामदासी यांनी तक्रारदाराकडून 15 हजार रूपयाची लाच घेतली. अ‍ॅन्टी करप्शनच्या पथकाने त्यांना रंगेहाथ पकडले. त्यांच्याविरूध्द वाशी पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना अटक करण्यात आली आहे.

 

छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhaji Nagar)
परिक्षेत्राचे पोलिस अधीक्षक संदीप आटोळे (SP Sandeep Atole),
अप्पर पोलिस अधीक्षक विशाल खांबे (Addl SP Vishal Khambe)
यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपअधीक्षक सिध्दाराम म्हेत्रे (DySP Siddharam Mhetre),
पोलिस अंमलदार दिनकर उगलमूगले, पोलिस सचिन शेवाळे, पोलिस विष्णू बेळे,
पोलिस सिध्देश्वर तावसकर यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.

 

Web Title :- ACB Trap News | Vashi (District Dharashiv) One of the land records office was arrested by anti-corruption while accepting a bribe of 15 thousand

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

ACB Trap News | लाचलुचपत प्रतिबंधक विभाग : सातारा जिल्हा न्यायालयातील वकिल 1 लाखाची लाच घेताना
अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळयात

Pune Crime News | कोंढवा पोलिसांकडून वाहन चोरी करणार्‍यास अटक, 5 गुन्हे उघडकीस

Maharashtra Political Crisis | ठाकरे गटाने कितीही प्रयत्न केले तरी…., अजित पवारांचं शिंदे-फडणवीस
सरकारबद्दल मोठं विधान

Pimpri Chinchwad Science Park | पिंपरी-चिंचवड तारांगण प्रकल्पाचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण