ACB Trap News | लाच घेताना महिला दुय्यम निबंधक अँन्टी करप्शनच्या जाळ्यात

चंद्रपूर : पोलीसनामा ऑनलाइन – ACB Trap News | शेत जमीन दुसऱ्या व्यक्तीचे नावे करण्यासाठी 10 हजार रुपये लाच स्वाकारताना (Accepting Bribe Case) महिला प्रभारी दुय्यम निबंधक यांना चंद्रपूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (Anti Corruption Bureau Chandrapur) सापळा रचून अटक केली. वैशाली वैजनाथ मिटकरी Vaishali Vaijnath Mitkari (वय 44 नोकरी, मूल्यांकन दुय्यम निबंधक (वर्ग 2) प्रभार दुय्यम निबंधक श्रेणी-1, मुल, ता. मूल, जि. चंद्रपूर) असे लाच घेताना (ACB Trap News) पकडण्यात आलेल्या महिला अधिकाऱ्याचे नाव आहे. एसीबीच्या पथकाने ही कारवाई गुरुवारी (दि.12) केली

याबाबत मूल तालुक्यातील मारोडा येथील 39 वर्षाच्या व्यक्तीने चंद्रपूर एसीबीकडे (Chandrapur ACB Trap) तक्रार केली आहे. तक्रारदार हे मूल तालुक्यातील मारोडा येथील रहिवासी असून दस्त लेखनाचे काम करतात. तक्रारदार त्यांच्या पक्षकार यांना त्यांची मुल येथील मालकीची शेत जमीन दुसऱ्या व्यक्तीचे नावावर करायची होती. त्यासाठी तक्रारदार हे पक्षकराचे दस्त नोंदणीचे कागदपत्रे घेऊन दुय्यम निबंधक कार्यालय मुल येथे गेले होते. त्यांनी मूल्यांकन दुय्यम निबंध प्रभारी दुय्यम निबंधक वैशाली मिटकरी यांच्याकडे कागदपत्रे सादर केली होती. त्यावेळी मिटकरी यांनी 15 हजार रुपये लाचेची मागणी केली. तडजोडी अंती 10 हजार रुपये मागितले. तक्रारदार यांना लाच (ACB Trap News) देणे मान्य नसल्याने त्यांनी चंद्रपूर एसीबीकडे याबाबत तक्रार केली.

एसीबीच्या पथकाने पंचासमक्ष पडताळणी केली असता दुय्यम निबंध प्रभारी दुय्यम निबंधक वैशाली मिटकरी यांनी
तक्रारदार यांच्याकडे 15 हजार रुपये लाचेची मागणी करुन तडजोडी अंती 10 हजार रुपये स्वीकारण्याचे मान्य केले.
त्यानुसार पथकाने सापळा रचला. तक्रारदार यांच्याकडून लाचेची रक्कम स्वीकारताना दुय्यम निबंध प्रभारी
दुय्यम निबंधक वैशाली मिटकरी यांना रंगेहाथ पकडण्यात आले. त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई नागपूर परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक राहुल माकणीकर (SP Rahul Maknikar),
अपर पोलीस अधीक्षक संजय पुरंदरे (Additional SP Sanjay Purandare) यांच्या मार्गदर्शनाखाली
चंद्रपूर एसीबीचे पोलीस उप अधीक्षक मंजुषा भोसले (DSP Manjusha Bhosale), पोलीस निरीक्षक प्रशांत पाटील
(PI Prashant Patil) पोलीस अंमलदार हिवराज नेवारे, वैभव गाडगे, अमोल सिडाम, पुष्पा काचोळे, शामराव बिडगर
यांच्या पथकाने केली.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

ACB Trap On Two Police Officers | 1 लाख रूपयाची लाच घेताना सहाय्यक पोलिस निरीक्षक (API) अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळयात, पोलिस उपनिरीक्षक (PSI) देखील गोत्यात, 2 अधिकार्‍यावरील कारवाईने पोलिस दलात प्रचंड खळबळ