ACB Trap On Dr Nilesh Apar | 40 लाखाच्या लाच प्रकरणी उपविभागीय अधिकारी डॉ. निलेश अपार अ‍ॅन्टी करप्शनच्या ‘रडार’वर, FIR दाखल

नाशिक : पोलीसनामा ऑनलाइन – ACB Trap On Dr Nilesh Apar | 50 लाखाच्या लाचेची मागणी करून तडजोडीअंती 40 लाख रूपयाच्या लाचेची मागणी करून ती लाच स्विकारण्याची तयारी दाखविल्याप्रकरणी नाशिक जिल्हयातील दिंडोरी (Dindori ACB Trap) उपविभागातील उपविभागीय अधिकारी डॉ. निलेश अपार Dindori Sub Divisional Officer Dr. Nilesh Apar (37, रा. स्वामी बंगला, शासकीय विश्रामगृह दिंडोरी, जि. नाशिक) यांच्याविरूध्द अ‍ॅन्टी करप्शनच्या पथकाने गुन्हा दाखल केला आहे (Nashik ACB Trap). 40 लाखाच्या लाच प्रकरणी उपविभागीय अधिकार्‍याविरूध्द गुन्हा दाखल झाल्याने प्रचंड खळबळ उडाली आहे. (ACB Trap On Dr Nilesh Apar)

 

याबाबत मुंबईतील 57 वर्षीय व्यक्तीने नाशिकच्या अ‍ॅन्टी करप्शन विभागाकडे तक्रार दिली होती. उपविभागीय अधिकारी डॉ. निलेश अपार यांनी दि. 22 मे 2023 रोजी लाचेची मागणी केली होती. याबाबत अधिक माहिती अशी की, यातील तक्रार यांची दिंडोरी येथे कंपनी असून त्यांचे कंपनीचे बांधकाम करताना त्यांनी अकृषीक परवानगीं न घेतल्याने त्यांचे कंपनीस आलोसे यांचेकडून नोटीस बजावण्यात आलेली होती (Nashik Bribe Case). तसेच कंपनीचे उत्पादन बंद करण्याबाबत तोंडी सांगितलेले होते (Dindori Bribe Case). सदर कंपनीवर कारवाई न करण्यासाठी तसेच बंद कंपनी पुन्हा सुरू करण्यासाठी तक्रारदार यांच्याकडे 50 लाखाची मागणी केली, तसेच तडजोडी अंती 40 लाख रुपयेची मागणी करून स्विकारण्याची तयारी दाखविली म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (ACB Trap On Dr Nilesh Apar)

 

नाशिक परिक्षेत्राच्या पोलिस अधीक्षक शर्मिष्ठा घारगे-वालावलकर (Nashik ACB SP Sharmistha Gharge-Walawalkar), अप्पर पोलिस अधीक्षक माधव रेड्डी (Addl SP Madhav Reddy ) यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उप अधीक्षक नरेंद्र पवार (DySP Narendra Pawar), पोलिस निरीक्षक संदिप साळुंखे (PI Sandeep Salunkhe), पोलिस हवालदार डोंगरे, पोलिस हवालदार इंगळे यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे. (Nashik Crime News)

 

 

Web Title :  ACB Trap On Dr Nilesh Apar | ACB Registered Case Against Sub-Divisional Officer Dr. Nilesh Apar in the case of 40 lakh bribe.


Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

 

 

Actor Prabhas | आदिपुरुष चित्रपटाच्या अपयशाचा प्रभासच्या करिअरवर काहीही परिणाम नाही; पुढ्च्या चित्रपटासाठी घेतले करोडो रुपये

MLA Aaditya Thackeray | मंत्रिमंडळ विस्ताराबाबत आदित्य ठाकरेंचे सूचक विधान, म्हणाले – ‘आता सरकार पडेल पण…’

Pune PMC ITI | पुणे महापालिकेच्या आयटीआयमध्ये अधुनिक तंत्रज्ञानाचे शिक्षण दिले जाणार