ACB Trap On Lady Police Inspector | अ‍ॅन्टी करप्शनमध्ये कार्यरत असलेल्या महिला पोलिस निरीक्षकास लाच घेताना पकडलं, पतीही ‘गोत्यात’

नांदेड : पोलीसनामा ऑनलाइन – ACB Trap On Lady Police Inspector | लाचखोरी रोखण्यासाठी महाराष्ट्रात पोलिस दलात स्वतंत्र विभाग आहे. लाच लुचपत प्रतिबंधक विभाग म्हणून तो ओळखला जातो. मात्र, लाचखोरीला आळा बसविण्याची जबाबदारी असलेल्याच लाच लुचपत प्रतिबंधक विभागातच (अ‍ॅन्टी करप्शन) भ्रष्टाचार होत असल्याचं समोर आलंय. प्राप्त तक्रार अर्जावर कारवाई न करण्यासाठी 2 मध्यस्थीमार्फत लाचेची मागणी करणार्‍या महिला पोलिस निरीक्षकास अ‍ॅन्टी करप्शनच्या पथकानं पकडलं आहे. या प्रकरणामुळं पोलिस दलात प्रचंड खळबळ उडाली आहे. (ACB Trap On Lady Police Inspector)

 

पोलिस निरीक्षक मीना बकाल (Police Inspector Meena Bakal) असे लाचेखोर महिला पोलिस निरीक्षकाचे नाव आहे. दरम्यान, त्यांना आणि त्यांच्या पतीला अटक करण्यात आली असून त्यांची रवानगी पोलिस कोठडीत करण्यात आली आहे. लातूर जिल्हयातील अहमदपूरमधील खाजा मगदूम शेख यांचे बंधू शेख मेहराज हे कंधारच्या तहसील कार्यालयासमोर कागदपत्रे तयार करून देण्याचा व्यवसाय करतात. दरम्यान, शेख यांना अ‍ॅन्टी करप्शनच्या कार्यालयातून चौकशीसाठी बोलावण्यात आलं.त्यानंतर त्यांना चौकशीसाठी बोलावण्यात आल्यानं थोडंसं घाबरल्यासारखं झालं. दरम्यान शेख यांच्याकडे 2 मध्यस्थांमार्फत त्यांच्याविरूध्द प्राप्त झालेल्या तक्रार अर्जावर कारवाई करून नये म्हणून 1 लाख रूपयाच्या लाचेची मागणी करण्यात आली. लाचेची मागणी होत असल्यानं शेख यांनी औरंगाबादच्या अ‍ॅन्टी करप्शन विभागाकडे तक्रार केली.

ज्या मध्यस्थांमार्फत लाचेची मागणी होत होती त्यांना दि. 21 नोव्हेंबर रोजी अटक करण्यात आली.
त्यानंतर त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीवरून अ‍ॅन्टी करप्शनच्या पथकानं पोलिस निरीक्षक मीरा बकाल
आणि त्यांचे पती कुलभूषण बावसकर (Kulbhushan Bavaskar) यांना अटक केली.
दरम्यान, बकाल आणि त्यांच्या पतीसह इतर दोघांना 30 नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.
पोलिस निरीक्षक मीरा बकाल या गेल्या वर्षभरापासून नांदेड येथील अ‍ॅन्टी करप्शन विभागात कार्यरत होत्या.
सन 2012 मध्ये बकाल या पोलिस दलात सेवत आल्या आहेत. (Nanded ACB Trap)

 

महिला पोलिस निरीक्षकावर अ‍ॅन्टी करप्शनकडून कारवाई झाल्याने प्रचंड खळबळ उडाली आहे.

 

Web Title :-  ACB Trap On Lady Police Inspector | acb lady police inspector arrested in bribery case the husband was also arrested aurangabad nanded acb trap

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Abdul Sattar On Thackeray Group | “एखाद्या महिलेनं मला चोर, गद्दार म्हंटलं तर कसं सहन करणार’? अब्दुल सत्तार यांचा प्रश्न

Bigg Boss Marathi | बिग बॉस मराठीच्या घरात ‘या’ कलाकारांनी घेतली वाईल्ड कार्ड एन्ट्री

BCCI-Guinness Book Of World Record | गुजरातमधील नरेंद्र मोदी स्टेडियमचा मोठा विश्वविक्रम; ‘गिनीज वर्ल्ड रेकॉर्डने घेतली दखल