ACB Trap On Lady Police Inspector | लाच प्रकरणी महिला पोलिस निरीक्षक ‘गोत्यात’, पोलिस हवालदार लाच घेताना अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात, पीआय मॅडमचा शोध सुरू

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाइन – ACB Trap On Lady Police Inspector | महिला पोलीस निरीक्षकाने (PI) गुटखा विक्रेत्याकडे दरमहा 25 हजार रुपये हप्त्याची मागणी करून तडजोडीअंती 10,000 रुपये घेण्याची तयारी दर्शविली (ACB Trap On Police Inspector Sunita Misal). रजेवर असलेल्या या पी. आय. मॅडमसाठी 10,000 रुपये आणि स्वत:चे 2,000 अशी एकूण 12 हजार रुपयांची लाच घेणारा पोलीस हवालदार (Police Constable) लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (Aurangabad ACB Trap) जाळ्यात सापडला आहे. पोलीस निरीक्षक सुनीता मिसाळ (Police Inspector Sunita Misal) आणि पोलीस हवालदार रणजीत सहदेव शिरसाट (Police Constable Ranjit Sahadev Shirsat) अशी आरोपींची नावे आहे. (ACB Trap On Lady Police Inspector)

 

एसीबी पथकाने हवालदाराला दौलताबादेत रंगेहाथ पकडले असून पीआय मिसाळचा शोध सुरू आहे. फिर्यादी तरुणाने 2 महिन्यांपूर्वी चोरट्या मार्गाने गुटखा विक्री सुरू केली होती. याबाबत दौलताबाद पोलिसांना (Daulatabad Police) कळले. त्यानंतर पोलीस हवालदार शिरसाट याने गुटखा विक्रेत्याला ठाण्यात बोलावून घेतले होते आणि त्याची भेट पोलीस निरीक्षक मिसाळ यांच्याशी करून दिली होती. तेव्हा त्यांनी त्याला दोन दिवसांनंतर ये, असे सांगितले. त्यांचा उद्देश समजल्याने त्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागात तक्रार केली. (ACB Trap On Lady Police Inspector)

दरम्यान त्यानंतर एसीबी पथकाने (ACB) Aurangabad) रेकॉर्डरसह फिर्यादीला 24 मार्च रोजी दौलताबाद ठाण्यात पाठविले. तेव्हा हवालदार रणजीत त्याला भेटला आणि त्याला घेऊन मिसाळ यांच्या केबिनमध्ये गेला. यावेळी तक्रार दारासोबत एसीबीचा पंचही होता. मिसाळ यांनी हा कोण आहे, अशी विचारना केली. तेव्हा गुटख्याचा होलसेल डीलर असल्याचे फिर्यादी तरुणाने सांगितले. दरम्यान मिसाळ यांच्या सांगण्यावरून रणजीतने दोघांची झडती घेतली. पण, त्यांच्याजवळील रेकॉर्डर त्याच्या हाती लागले नाही.

 

यावेळी दरमहा 25 हजार रुपये हप्ता आणि 1 केस केली जाईल, असं सांगितलं. तेव्हा नव्यानेच व्यवसाय सुरू केल्याने एवढी रक्कम देणे शक्य नसल्याचे फिर्यादी तरुणाने सांगितले.
तडजोडीअंती त्याने 10 हजार हप्ता देण्याचं ठरलं. केबिनमधून बाहेर आल्यानंतर सिरसाट म्हणाला आम्ही गरीब आहोत,
वेगळे 2 हजार माझे असतील. 2 – 3 दिवसांत आणून देतो, असं सांगून फिर्यादी ठाण्यातून बाहेर आला.
यानंतर 4 दिवसानंतर सिरसाटने पैशाचा तगादा लावत 12 हजाराची मागणी केली. 12 हजार लाच स्वीकारताना एसीबीच्या पोलिसांनी त्यास रंगेहाथ पकडले.

 

सदरची कारवाई पोलीस उपअधीक्षक मारोती पंडित (DYSP Maroti Pandit),
पोलीस निरीक्षक एन. एच. क्षीरसागर (Police Inspector N.H. Kshirsagar), हवालदार राजेंद्र जोशी (Constable Rajendra Joshi),
प्रकाश घुगरे (Prakash Ghugare), चांगदेव बागूल (Changdev Bagul) आणि आशा कुंटे (Asha Kunte) यांनी केली.

 

Web Title :- ACB Trap On Lady Police Inspector | ACB Trap On Police Inspector Sunita Misal And Police Havaldar Ranjit Shirsat

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा