ACB Trap On PI Ramchandra Ware | बदली करण्यासाठी 1 लाख रुपये लाच घेणारा पोलीस निरीक्षक अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

पालघर : पोलीसनामा ऑनलाइन – ACB Trap On PI Ramchandra Ware | तक्रारदार आणि त्यांच्या सहकाऱ्याची बदली (Transfer) करण्यासाठी दोघांचे मिळून 1 लाख रुपये लाच घेताना (Accepting Bribe) महामार्ग सुरक्षा पथक, पनवेल विभागाचे (Highway Safety Squad, Panvel Division) पोलीस निरीक्षक रामचंद्र नारायण वारे (ACB Trap On PI Ramchandra Ware) यांना ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून रंगेहाथ पकडले आहे. ठाणे एसीबीच्या (Thane ACB) पथकान ही कारवाई मंगळवारी (दि.20) सायंकाळी 6.36 वाजता पोलीस निरीक्षक वारे यांच्या केबिनमध्ये केली.

 

याबाबत 41 वर्षीय व्यक्तीने ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे (Thane Anti Corruption Bureau) पोलीस निरीक्षक रामचंद्र वारे यांनी लाच मागितल्याची (ACB Trap On PI Ramchandra Ware) तक्रार केली होती. तक्रारदार आणि त्यांच्या सहकाऱ्याची बदली करण्यासाठी पोलीस निरीक्षक रामंचंद्र वारे यांनी प्रत्येकी 50 हजार प्रमाणे 1 लाख रुपये लाच मागितली. तक्रारदार यांना लाच देणे मान्य नसल्याने त्यांनी ठाणे एसीबीकडे तक्रार केली.

 

लाचलुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांनी सोमवारी (दि.19) पंचासमक्ष पडताळणी केली असता,
पोलीस निरीक्षक वारे यांनी बदली करण्यासाठी एक लाख रुपये मागितल्याचे निष्पन्न झाले.
मंगळवारी सायंकाळी ठाणे एसीबीच्या पथकाने सापळा रचला.
तक्रारदार यांच्याकडून एक लाख रुपये लाच घेताना वारे यांना रंगेहात पकडण्यात आले.
वरीष्ठ पोलीस अधिकाऱ्याला लाच घेताना अटक करण्यात आल्याने पालघर पोलीस दलात खळबळ उडाली आहे.

ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक ठाणे विभागाचे पोलीस अधीक्षक पंजाबराव उगले (SP Punjabrao Ugale),
अपर पोलीस अधीक्षक अनिल घेरडीकर (Addl SP Anil Gherdikar),
लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पालघर पोलिस उपअधीक्षक नवनाथ जगताप (Deputy Superintendent of Police Navnath Jagtap)
यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक स्वपन बिश्वास (Police Inspector Swapan Biswas),
पोलीस हवालदार संजय सुतार, अमित चव्हाण, विलास भोये, निशा मांजरेकर, नवनाथ भगत,
पोलीस नाईक दिपक सुमडा, सखाराम दोडे यांच्या पथकाने केली.

 

Web Title :- ACB Trap On PI Ramchandra Ware | Police inspector who took bribe of Rs 1 lakh for transfer in anti-corruption trap

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Lumpy Virus | पिंपरी चिंचवड शहरी भागात लम्पीचा शिरकाव, पाच जनावरांना प्रादुर्भाव; आयुक्त शेखर सिंह यांनी घेतला आढावा

Beed ACB Trap | 1500 रुपये लाच घेताना सहायक सरकारी महिला वकील अँन्टी करप्शनच्या जाळ्यात

Maharashtra Politics | पत्राचाळ प्रकरणी अतुल भातखळकर यांचा गंभीर आरोप, म्हणाले – ‘शरद पवार हेच खरे रिंग मास्टर…’