ACB Trap On Police Havaldar | दोन हजाराची लाच घेताना पोलीस हवालदार अँन्टी करप्शनच्या जाळ्यात

नाशिक : पोलीसनामा ऑनलाइन – ACB Trap On Police Havaldar | ओझर पोलीस ठाण्यात (Ozar Police Station) पोलीस हवालदार (Police Havaldar) म्हणून नियुक्त असलेले कारभारी भिला यादव (Karbhari Bhila Yadav) यांना तक्रारदाराकडून दोन हजार रुपये लाच घेताना (Accepting Bribe) नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (Anti Corruption Bureau (ACB) Nashik) रंगेहाथ पकडले. पंचवटीतील सीतागुंफा (Sita Gufa) परिसरात नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB Nashik) रविवारी (दि.12) सापळा रचून ही कारवाई केली. याप्रकरणी यादव याच्याविरुद्ध पंचवटी पोलीस ठाण्यात (Panchavati Police Station) भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमांतर्गत (Prevention of Corruption Act) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (ACB Trap On Police Havaldar)

 

धनादेश न वटल्याप्रकरणी (Check Bounce) दाखल गुन्ह्यात मदत करण्याच्या मोबदल्यात दोन हजार रुपयांची लाचेची मागणी तक्रारदाराकडे यादव यांनी केली होती. न्यायालयाने तक्रारदाराला पकड वॉरंट (Arrest warrant) बजावले होते. त्यानुसार यादव यांनी तक्रारदाराशी संपर्क साधला व त्यांना न्यायालयात हजर करण्यासाठी पकड वॉरंटमध्ये जामीनदार (Guarantor) यांचे कागदपत्रे घेऊन मदत करण्याचे आमिष दाखवले. त्या मोबदल्यात यादव यांनी तक्रारदार यांच्याकडे दोन हजार रुपयांची लाच मागितली. (ACB Trap On Police Havaldar)

 

तक्रारदार यांना लाच देणे मान्य नसल्याने त्यांनी नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी (Nashik Bribe Case) संपर्क साधला.
यानंतर पथकाने पडताळणी करुन पंचवटी येथील सीतागुंफा परिसरात रविवारी सापळा रचला.
यादव यांनी तक्रारदार यांच्याकडून लाचेची रक्कम स्वीकारताना पथकाने यादव यांना ताब्यात घेतले.
यादव यांच्याविरुद्ध पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे.

 

Web Title :- ACB Trap On Police Havaldar | Police Havaldar Arrest In Bribe Case of Two thousands Nashik ACB Crime News

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा