ACB Trap On Police Inspector Vijay Mane | 1 लाख रूपये किंवा iPhone मोबाईलची मागणी करून लाच घेणार्‍या पोलिस निरीक्षकास अ‍ॅन्टी करप्शनकडून अटक

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – ACB Trap On Police Inspector Vijay Mane | एक लाख रूपये किंवा आय फोनच्या लाचेची मागणी करून तडजोडीअंती 40 हजार रूपयाची लाच स्विकारणार्‍या मुंबई पोलिस दलातील (Mumbai Police) धारावी पोलिस ठाण्यातील (Dharavi Police Station) पोलिस निरीक्षकास अ‍ॅन्टी करप्शनच्या पथकाने रंगेहाथ पकडले आहे (Mumbai ACB Arrest Police Inspector Vijay Shivdas Mane) . यामुळे मुंबई पोलिस दलात प्रचंड खळबळ उडाली आहे. (ACB Trap On Police Inspector Vijay Mane)

विजय शिवदास माने PI Vijay Shivdas Mane (53) असे अटक करण्यात आलेल्या पोलिस निरीक्षकाचे नाव आहे. ते धारावी पोलिस ठाण्यात कार्यरत होते. याबाबत अधिक माहिती अशी की, तक्रारदार आणि त्यांच्या आईविरूध्द धारावी पोलिस ठाण्यात फसवणूकीचा (Cheating Case) गुन्हा दि. 16 नोव्हेंबर 2022 रोजी दाखल आहे. त्या गुन्हयात तक्रारदारास दि. 16 नोव्हेंबर 2022 रोजी अटक करण्यात आली होती. त्यानंतर तक्रारदार हे पोलिस निरीक्षक विजय शिवदास माने यांना भेटले.

निरीक्षक माने यांनी दाखल गुन्हयातील कलम कमी करण्याकरिता एक लाख रूपये किंवा आय फोनच्या
लोचेची मागणी केली. तक्रारदार यांना लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी दि. 23 मार्च 2023 रोजी
अ‍ॅन्टी करप्शनकडे (Mumbai ACB Trap) त्यांच्याविरूध्द तक्रार केली. तक्रारीची पडताळणी करण्यात आली.
दि. 24 मार्च 2023 रोजी तडजोडीअंती पोलिस निरीक्षक विजय माने यांनी सरकारी पंचासमक्ष 40 हजार
रूपयाची लाच घेतली (Mumbai Bribe Case). त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले.
त्यांच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना अटक करण्यात आली आहे.

Web Title :-  ACB Trap On Police Inspector Vijay Mane | Dharavi Station Police inspector Vijay Shivdas Mane arrested by anti-corruption for demanding Rs 1 lakh or iPhone mobile

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Pimpri Chinchwad Crime | अटक केलेल्या आरोपीकडून दोन पोलिसांना मारहाण, वाकड परिसरातील घटना

Ajit Pawar In Maharashtra Budget Session | राष्ट्रीय नेत्याच्या प्रतिमेला जोडे मारणे योग्य नाही, कारवाई करा, अजित पवारांची मागणी; तर आमच्याकडेसुद्धा पायताणं आहेत, बाळासाहेब थोरातांचा सरकारला इशारा