ACB Trap On Police Sub Inspector | आर्थिक गुन्हे शाखेचा पोलीस उपनिरीक्षक (PSI) 3 हजाराची लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाइन – ACB Trap On Police Sub Inspector | दाखल गुन्ह्यात मदत करण्यासाठी तीन हजार रुपयाची लाच घेताना (Accepting Bribe) औरंगाबाद आर्थिक (Economic Offences Wing Aurangabad) गुन्हे शाखेच्या (Aurangabad Police) पोलीस उपनिरीक्षकाला (PSI) औरंगाबाद लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (Anti Corruption Bureau (ACB) Aurangabad) रंगेहाथ पकडले. भाऊसाहेब जमदाडे (Bhausaheb Jamdade) असे लाच घेताना पकडलेल्या पोलीस अधिकाऱ्याचे नाव आहे. औरंगाबाद लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (Aurangabad ACB Trap) ही कारवाई मंगळवारी (दि.7) बिडकीन पोलीस ठाण्याच्या (Bidkin Police Station) परिसरात केली. या कारवाईमुळे पोलीस दलात प्रचंड खळबळ उडाली आहे. (ACB Trap On Police Sub Inspector)

 

मिळालेल्या माहितीनुसार, बिडकीन पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बँक ऑफ बडोदा (Bank of Baroda) या शाखेचा एका प्रकरणाचा तपास औरंगाबाद आर्थिक गुन्हे शाखेकडून सुरु आहे. या तपासात बीडकीन परिसरातील एका तक्रारदास मदत करण्यासाठी पोलीस उपनिरीक्षक जमदाडे यांनी लाच मागितली. तक्रारदार यांना लाच देणे मान्य नसल्याने त्यांनी औरंगाबाद लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली.

प्राप्त तक्रारीची पडताळणी केली असता पोलीस उपनिरीक्षक जमदाडे याने लाच मागितल्याचे निष्पन्न झाले.
त्यानुसार पथकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी बिडकीन पोलीस ठाण्याच्या परिसरात आज (मंगळवार) सापळा रचला.
तक्रारदार यांच्याकडून तीन हजार रुपये लाच घेताना जमदाडे यांना रंगेहाथ पकडण्यात आले.
जमदाडे यांच्याविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत (Prevention of Corruption Act) बिडकीन पोलीस ठाण्यात गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे.

 

Web Title :- Aurangabad ACB Trap On Police Sub Inspector Bhausaheb Jamdade of economic offences wing Eow crime branch

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Gold Price Today | कमॉडिटी बाजार ! सोन्याच्या दरात तेजी कायम, तर चांदी उतरली; जाणून घ्या

 

Pune Crime | पुण्यातील सराईत गुन्हेगार प्रशांत जाधव व त्याच्या टोळीवर ‘मोक्का’ ! आयुक्त अमिताभ गुप्तांची आजपर्यंतची 82 वी कारवाई

 

MPSC Develops Mobile App | विद्यार्थ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी MPSC ने तयार केले मोबाईल ॲप

 

Pune Crime | पर्वती दर्शनमधील जुगार अड्ड्यावर सामाजिक सुरक्षा विभागाचा छापा; दुकानात व दुकानाबाहेर बाईकवर सुरु होता जुगार, 16 जणांवर गुन्हा दाखल