ACB Trap On PSI Prashant Kshirsagar | 12 हजारांची लाच घेताना पोलिस उपनिरीक्षक (PSI) अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

सोलापूर : पोलीसनामा ऑनलाइन – ACB Trap On PSI Prashant Kshirsagar | रेल्वे स्टेशन (Railway Station Solapur) परिसरात उभ्या करण्यात येणार्‍या गाड्यांवर कारवाई न करण्यासाठी १२ हजार रुपयांची लाच (Bribe) स्वीकारताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने (Solapur ACB Trap) सापळा रचून एका पोलीस उपनिरीक्षकाला (ACB Trap On PSI Prashant Kshirsagar) रंगेहाथ पकडले.

 

पोलीस उपनिरीक्षक प्रशांत सूर्यकांत क्षीरसागर PSI Prashant Suryakant Kshirsagar (वय ३४, रा. सदर बझार पोलीस ठाणे, अंतर्गत रेल्वे स्टेशन पोलीस चौकी, सोलापूर शहर) असे या अटक (Arrest) केलेल्याचे नाव आहे.

 

सोलापूर येथील रेल्वे स्टेशन परिसरात तक्रारदार तसेच त्यांच्या ओळखीचे काही व्यावसायिक त्यांच्या खासगी गाड्या प्रवासी वाहतुकीकरीता उभ्या करतात. पोलीस उपनिरीक्षक प्रशांत क्षीरसागर याने तक्रारदार व त्याच्या ओळखीच्या इतरांच्या गाड्यांवर कोणतीही कारवाई न करण्याकरीता मासिक हप्ता स्वरुपात १३ हजार रुपयांची मागणी केली. तक्रारदार यांनी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे (Anti Corruption Bureau Solapur) तक्रार केली.
या तक्रारीची पडताळणी करताना प्रशांत क्षीरसागर याने तडजोड करुन १२ हजार रुपये स्वीकारण्याची तयारी दर्शविली. (Solapur ACB Trap)

 

त्यानंतर पोलीस अधीक्षक राजेश बनसोडे (SP ACB Rajesh Bansode), अपर अधीक्षक सुरज गुरव (Addl SPSuraj Gurav),
पोलीस उपअधीक्षक संजीव पाटील (DySP Sanjeev Patil) यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक चंद्रकांत कोळी (Police Inspector Chandrakant Koli),
पोलीस अंमलदार शिरीषकुकार सोनवणे, अतुल घाडगे, श्रीराम घुगे, प्रमोद पकाले, उमेश पवार, शाम सुरवसे
यांनी सापळा रचला. तक्रारदाराकडून १२ हजार रुपये स्वीकारताना उपनिरीक्षक प्रशांत क्षीरसागर याला पकडण्यात आले.

 

Web Title :- ACB Trap On PSI Prashant Kshirsagar | Sub-Inspector of Police (PSI) caught in anti-corruption scam while accepting bribe of Rs 12,000

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

MLA Tanaji Sawant | शिवसेनेचे बंडखोर आमदार तानाजी सावंत यांच्या पुण्यातील कार्यालयाची तोडफोड

 

CM Uddhav Thackeray | उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल; म्हणाले – ‘हिंदुत्वाबद्दल जो बोलतो तो त्यांचा शत्रू’

 

Gold Silver Price Today | जाणून घ्या आजचे सोन्या-चांदीचे दर