ACB Trap On Talathi | उताऱ्यावर नाव लावण्यासाठी 2 हजाराची लाच घेताना तलाठी एसीबीच्या जाळ्यात

नाशिक : पोलीसनामा ऑनलाइन – ACB Trap On Talathi | आईच्या मृत्यूनंतर आईच्या सामाईक जमिनीच्या 7/12 उताऱ्यावर नाव लावण्यासाठी 2 हजार रुपये लाच घेताना नांदगाव येथील तलाठ्याला (Nandgaon Talathi) नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (Anti Corruption Bureau (ACB) Nashik) रंगेहात पकडले. युवराज रामदास मासोळे (Yuvraj Ramdas Masole) असे लाच घेताना (Accepting Bribe) पकडलेल्या तलाठ्याचे नाव आहे. नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई नांदगाव येथील तलाठी कार्यालयात सापळा रचून केली. (ACB Trap On Talathi)

 

तक्रारदार यांच्या भाचीचे तिच्या आईच्या मृत्यूनंतर आईच्या नावावर असलेल्या जमिनीच्या 7/12 उताऱ्यावर तिचे कायदेशीर नाव लावण्यासाठी युवराज मासोळे यांनी 5 हजार रुपये लाच मागितली. तडजोडीअंती 2 हजार रुपये देण्याचे ठरले होते. तक्रारदार यांना लाच देणे मान्य नसल्याने त्यांनी नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. (ACB Trap On Talathi)

 

नाशिक एसीबीने (Nashik ACB) तक्रारीची पडताळणी केली असता युवराज मासोळे याने 5 हजार रुपये लाच मागून तडजोडीअंती 2 हजार रुपये घेण्याचे कबूल केले. त्यानुसार पथकाने सोमवारी (दि.13) नांदगाव येथील तलाठी कार्यालयात सापळा रचला. तलाठी मासोळे याला तक्रारदार यांच्याकडून लाच घेताना रंगेहाथ पकडले. युवराज मासोळे विरुद्ध गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे.

 

Web Title :- ACB Trap On Talathi | Talathi Arrest While Accepting Bribe Of Two Thousands Nashik Crime News

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा