ACB Trap Pune | लाच मागणाऱ्या पोलीस हवालदार व होमगार्डवर पुणे एसीबीकडून गुन्हा दाखल

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – ACB Trap Pune | वॉरंटमध्ये अटक (Arrest) न करण्यासाठी 1 हजार रुपयाची लाचेची मागणी (Demand Of Bribe) करणाऱ्या पोलीस हवालदार आणि होमगार्डवर पुणे लाचलुचपत प्रतबिंधक विभागाने (Anti Corruption Bureau (ACB) Pune) बारामती शहर पोलीस ठाण्यात (Baramati City Police Station) भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम कलमांतर्गत (Prevention of Corruption Act) गुन्हा (FIR) दाखल केला आहे. पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पोलीस हवालदार आण्णासाहेब नामदेव उगले Police Constable Annasaheb Namdev Ugale (वय-49) आणि होमगार्ड सनी शामराव गावडे (Homeguard Sunny Shamrao Gawde) यांच्याविरुद्ध सोमवारी (दि.23) गुन्हा दाखल केला आहे. (ACB Trap Pune)

 

याबाबत 37 वर्षाच्या व्यक्तीने पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली आहे. आरोपी आण्णासाहेब उगले हे पुणे ग्रामीण पोलिसांच्या (Pune Rural Police) बारामती शहर पोलीस ठाण्यात (Pune Rural Police) पोलीस हवालदार म्हणून कार्यरत आहेत. तक्रारदार यांच्यावर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून वॉरंटमध्ये (Warrant) अटक न करण्यासाठी तक्रारदार यांच्याकडे एक हजार रुपये लाच मागितली होती. तक्रारदार यांना लाच देणे मान्य नसल्याने त्यांनी पुणे एसीबीकडे (Pune ACB) तक्रार केली. (ACB Trap Pune)

 

पथकाने 5 मे आणि 6 मे रोजी तक्रारीची पडताळणी केली असता तक्रारदार यांना वॉरंटमध्ये अटक न करण्यासाठी होमगार्ड सनी गाढवे याने एक हजार रुपये लाच मागितली. तडजोडीमध्ये 800 रुपये मागणी केली. तर पोलीस हवालदार उगले यांनी लाचेच्या मागणीला प्रोत्साहन दिले. पुणे एसीबीने सोमवारी दोघांविरुद्ध बारामती शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक राजेश बनसोडे (Pune ACB SP Rajesh Bansode),
अपर पोलीस अधीक्षक सुरज गुरव (Addl SP Suraj Gurav) यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे युनिटच्या पथकाने केली.
पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रविण निंबाळकर (Police Inspector Pravin Nimbalkar) करीत आहेत.

 

 

Web Title :- ACB Trap Pune | Demand Of Bribe Police Officer Pune Rural Police Homeguard Anti Corruption Bureau (ACB) Pune

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

V Mart Story | कर्ज घेवून सुरू झालेले फोटोकॉपीचे दुकान ते 1000 कोटीची कंपनी, जाणून घ्या कसे उभे राहीले व्ही मार्ट

 

Pune PMC Action | स्टॉल्सचे बेकायदेशीररित्या ‘गाळ्यांमध्ये’ रुपांतर ! बिबवेवाडी गावातील स्टॉलधारक अडचणीत; महापालिकेने बिबवेवाडी रस्त्यावरील तब्बल 67 गाळे केले सील

 

Pune Crime | पुण्यात गांजा विक्रीसाठी आलेल्या दोघांना गुन्हे शाखेकडून अटक, 8.5 लाखाचा मुद्देमाल जप्त