PM नरेंद्र मोदींचे सल्लागार म्हणून अमरजीत सिन्हा आणि भास्कर खुल्बे यांची नियुक्ती

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सेवानिवृत्त आयएएस अमरजीत सिन्हा आणि भास्कर खुल्बे यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. अमरजीत सिन्हा हे बिहारचे 1983 च्या बॅचचे अधिकारी आहेत. तर भास्कर खुल्बे हे पश्चिम बंगालचे 1983 च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत.
अमरजीत सिन्हा आणि भास्कर खुल्बे हे दोघे सेवानिवृत्त आहे. या दोन अधिकाऱ्यांचा कार्यकाळ दोन वर्षांचा असणार आहे. अमरजीत सिन्हा मागिल वर्षी ग्रामविकास सचिवपदावरून निवृत्त झाले. त्याचवेळी निवृत्त होणारे खुल्बे यांनी पीएमओमध्ये काम केले होते. या दोन अधिकाऱ्यांची नियुक्ती दोन वर्षांसाठी करण्यात आली आहे.

You might also like