Accenture Layoffs | गुगल, मेटानंतर अॅक्सेंचर कंपनीचा मोठा निर्णय, तब्बल इतक्या हजार कर्मचाऱ्यांना कामावरुन काढणार

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – मागील काही महिन्यांपासून गूगल (Google), मेटा (Meta), फेसबूकसह (Facebook) अनेक बहुराष्ट्रीय कंपन्यांनी (Multinational Companies) मोठी नोकर कपात केली आहे. त्यामुळे अनेक सुशिक्षित तरुण बेरोजगार (Unemployed) झाले असतानाच आता आयटी क्षेत्रातील दिग्गज कंपनी (IT Company) असलेल्या अॅक्सेंचर कंपनीत मोठी नोकर कपात (Accenture Layoffs) करण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनीने तब्बल 19 हजार कर्मचाऱ्यांना कामावरुन काढण्याची (Accenture Layoffs) घोषणा केली आहे. त्यामुळे आयटी क्षेत्रासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. काही दिवसांपूर्वी मेटा कंपनीत नोकर कपात केली होती. त्यानंतर आता आयटी क्षेत्रातही नोकर कपात केल्यामुळे अनेक सुशिक्षित बेरोजगारांची धाकधूक वाढली आहे.
अॅक्सेंचर कंपनीनं एकूण कर्मचारी संख्येपैकी 2.5 टक्के म्हणजे 19 हजार कर्मचाऱ्यांची कपात (Accenture Layoffs) करण्याचा निर्णय घेतला आहे. ग्लोबल इकोनॉमिक आउटलूकला (Global Economic Outlook) कंपनीने यासाठी जबाबदार ठरवलं आहे. टेक्नोलॉजी बजेटच्या कपातीमुळे अॅक्सेंचर कंपनीनं हा निर्णय घेतला असल्याचे बोलले जात आहे. याशिवाय कंपनीने त्यांच्या वार्षिक महसूल आणि नफ्यासंदर्भात जाहीर केलेले अंदाज देखील कमी केले आहेत.
कंपनीकडून पत्रक जारी
निर्धारित अंदाजापेक्षा कमी वार्षिक महसूल मिळाल्यामुळं यापूर्वीच कंपनीने नोकर कपातीचे संकेत दिले होते. त्यानंतर आता कंपनीनं थेट एक पत्रक जारी करत नोकरकपातीची घोषणा केली आहे. कंपनीला वाटतंय की, लोकल करन्सीमध्ये वार्षिक महसुलात 8 ते 10 टक्के वाढ होईल. पूर्वी ही वाढ 8 ते 11 टक्के एवढी होती. 2023 या आर्थिक वर्षात 16.01 ते 16.07 अब्ज डॉलर्स इतका महसूल कंपनीला मिळेल, असंही अॅक्सेंचर कंपनीनं म्हटलं आहे.
नोकर कपात करणाऱ्या कंपन्या
मायक्रोसॉफ्ट – 10 हजार
अमेझॉन – 27 हजार
मेटा – 21 हजार
अॅक्सेंचर – 19 हजार
अल्फाबेट – 12 हजार
Web Title :- Accenture Layoffs | Google, Accenture’s big decision after Meta, will lay off thousands of employees
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
Pune PMC Property Tax | 40 टक्के करासहीत भरलेली रक्कम परत कारावी, महापालिका आयुक्तांकडे मागणी