१,७५,००० ची लाच स्विकारताना सहायक निबंधक अॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

जळगाव : पोलीसनामा ऑनलाईन

गृहनिर्माण संस्थेचा परवाना रद्द न करण्यासाठी १ लाख ७५ हजार रुपयांची लाचेची मागणी करुन लाच स्विकारताना अॅन्टी करप्शनच्या पथकाने रंगेहाथ पकडले. ही कारवाई आज (मंगळवार)  जळगाव येथील सहायक निबंधक कार्यालयात करण्यात आली.
[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’da4526b0-cbc9-11e8-8b24-77e8e03db5fe’]

मधुसुदन हरनिवास लाठी (वय-५२) असे अटक करण्यात आलेल्या सहायक निबंधकाचे नाव आहे. याप्रकरणी ४६ वर्षीय इसमाने जळगाव लाचलुचपत प्रितिबंध विभागाकडे तक्रार दिली आहे.

मधुसुदन लाठी हा एरंडोल येथे सहायक निबंधक पदावर कार्य़रत असून सध्या उप निबंधक पदाचा अतिरीक्त पदभार आहे. तक्रारदार यांची एक सहकारी गृहनिर्माण संस्था आहे. गृहनिर्माण संस्था रद्द होऊ नये यासाठी आरोपी लोकसेवक यांनी अपीलात अनुकूल से (Say) देण्याकरीता तक्रारदार यांचेकडे शनिवारी (दि.६) १ लाख ७५ हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. तक्रारदार यांनी याची तक्रार जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक पथकाकडे तक्रार दाखल केली होती. पथकाने याची पडताळणी केली असता आरोपी लाठी याने लाचेची मागणी केली असल्याचे निष्पन्न झाले. पथकाने सहायक निबंधक कार्य़ालयात सापळा रचून १ लाख ७५ हजार रुपायांची लाच घेताने लाठी याला रंगेहाथ पकडण्यात आले.
[amazon_link asins=’B07CRCPM4T’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’df787b67-cbc9-11e8-840c-7db4680c0da9′]

ही कारवाई जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उप अधीक्षक जी.एम. ठाकुर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक निलेस लोधी यांच्या पथकाने केली.

सरकारी कामासाठी लोकसेवक लाचेची मागणी करीत असल्यास नागरिकांनी लाचलुचपत प्रतिबंध विभागाकडे तक्रार करावी, असे आवाहन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. तसेच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या १०६४ या हेल्प लाईन क्रमांक किंवा ७८७५३३३३३३ या व्हॉट्स अॅप नंबरवर संपर्क साधावा.