५ हजार रुपयांची लाच स्विकरणारा कार्य़कारी अभियंता एसीबीच्या जाळ्यात

हिंगोली : पोलीसनामा ऑनलाइन – शाळेचे केलेले बांधकाम पुस्तीकेचे मोजमाप करून देण्यासाठी जिल्हा परिषद शिक्षणच्या समग्र शिक्षा अभियान विभागातील कार्यकारी अभियंत्यास पाच हजारांची लाच स्वीकारताना अ‍ॅन्टी करप्शनच्या पथकाने रंगेहात पकडले. ही कारवाई पथकाने आज (मंगळवार) दुपारी केली. विजय अग्रवाल असे रंगेहाथ पकडण्यात आलेल्या कार्यकारी अभियंत्याचे नाव आहे.

पोलीसनामावरील ताज्या बातम्या आणि व्हिडीओ पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करुन पोलीसनामाचे फेसबुक पेज आत्ताच लाईक करा.👇👇

शाळेचे केलेले बांधकाम पुस्तीकेचे मोजमाप करुन देण्यासाठी अभियंता अग्रवाल याने पैशांची मागणी केली होती. याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबधक विभागाकडे तक्रारदाराने तक्रार केली. त्यानुसार पथकाने पडताळणी केली असता विजय अग्रवाल हा तक्रारदाराकडून पाच हजार रुपयांची लाच स्विकारताना रंगेहाथ पकडण्यात आले. या कारवाईने खळबळ उडाली आहे. अग्रवाल याला पथकाने ताब्यात घेतले असून त्याच्याकडे चौकशी सुरु आहे.

सरकारी कामासाठी लोकसेवक लाचेची मागणी करीत असल्यास नागरिकांनी लाचलुचपत प्रतिबंध विभागाकडे तक्रार करावी, असे आवाहन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. तसेच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या १०६४ या हेल्प लाईन क्रमांकावर संपर्क साधावा.