महिलेकडून २५ हजारांची लाच स्वीकारताना तलाठी ‘अ‍ॅन्टी करप्शन’च्या जाळ्यात

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन – सातबारा उतारावर फेरफार नोंद घेण्यासाठी २५ हजारांची लाच स्वीकारताना कामगार तलाठी एसीबीच्या जाळ्यात अडकला. नाशिकच्या पथकाने राहुरी तालुक्यातील मालुंजा येथे ही कारवाई केली.

बाबासाहेब रामजी पंडित (वय-४०, व्यवसाय-कामगार तालाठी मौजे मालुंजा, रा. देवळारी प्रवरा, ता,राहुरी) हे अटक केलेल्या कामगाराच्या तलाठ्याचे नाव आहे. याबाबत समजलेली माहिती अशी की, महिलेच्या ७/१२ उताऱ्यावर फेरफार नोंद घेण्यासाठी पंचवीस हजार रुपयांची लाच मागितली होती. सदर रक्कम आज देण्याचे ठरले होते. याबाबत सदर महिलेने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या नाशिक येथील पथकाकडे तक्रार केली होती. त्यावरून पोलीस उपअधीक्षक विजय जाधव, पोलीस कर्मचारी प्रकाश डोंगरे, शाम पाटील, विनोद शिंपी आदींच्या पथकाने सापळा रचला. आज रात्री २५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना कामगार तलाठी बाबासाहेब पंडित याला रंगेहाथ पकडले.

याप्रकरणी राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती.

उच्च रक्तदाब नियंत्रित करण्यासाठी ७ उपाय

‘तळहात’ पाहून सुद्धा ओळखू शकता, तुम्हाला आहे कोणता आजार ?

‘या’ गोष्टींचे सेवन करणाऱ्या महिलांना कधीही होत नाही ‘ब्रेस्ट कॅन्सर’

रोज सकाळी ‘मनुक्यांचे पाणी’ प्या आणि मिळवा ‘हे’ आश्चर्यकारक फायदे

रक्ताचा अभाव, कॅन्सरसारख्या गंभीर आजारांवर ‘पांढरा कांदा’ उपयोगी