शुद्ध रक्तपुरवठ्यासाठी (NAT) आधुनिक रक्ततपासणी आवश्यक

पोलीसनामा ऑनलाइन टीम – एखाद्या व्यक्तीला रक्ताची कमतरता भासली. तर तिला बाहेरून रक्तपुरवठा केला जातो. रक्तदान शिबिरात ज्यांनी रक्तदान केले आहे. अशा व्यक्तींचे रक्त त्या रुग्णाला पुरवले जाते. पण या रक्ताची जर योग्य तपासणी झाली नाही. आणि त्या व्यक्तीचे रक्त जर दूषित असेल तर त्याची इजा त्या रुग्णाला होते. त्यामुळे कोणत्याही रक्तदात्याचे रक्त घेताना किंवा एखाद्या रुग्णाला रक्तपुरवठा करताना त्या रक्ताची (NAT) म्हणजे आधुनिक तपासणी करणे अत्यंत आवश्यक आहे.

नॅकोच्या अहवालानुसार, मागील एका वर्षात रक्त संक्रमणामुळे १६९ रुग्णांना एचआयव्ही इन्फेक्शन झालं आहे. त्यामुळे शुद्ध रक्तपुरवठा होणं खूप गरजेचं आहे. शुद्ध रक्तपुरवठा होणं किती महत्वाच आहे. याची जनजागृती होण्यासाठी पुण्यामध्ये जनकल्याण ब्लड बँकेने एक परिषद आयोजित केली होती. या परिषदेत अशुद्ध रक्त पुरवठा केल्याने रुग्णाच्या आरोग्यावर किती परिणाम होतो. यावर चर्चा घेण्यात आली. या अशुद्ध रक्ताने आरोग्य व्यवस्था धोक्यात येते.

त्यामुळे (NAT) आधुनिक तपासणी करणे किती गरजेचे आहे. यावर चर्चा करण्यात आली. (NAT) या आधुनिक रक्ततपासणीमुळे १११ रुग्णांचा जीव वाचवने शक्य झाले आहे. त्यामुळे आधुनिक पद्धतीने रक्त तपासणी केल्यास रुग्णाचे आरोग्य सुरक्षित राहते.

फेसबुक पेज लाईक करा –