पुण्यात ‘कोरोना’ बाधितांना घेऊन् जाणार्‍या रूग्णवाहिकेला अपघात

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन  –  चतुःश्रुगी परिसरात संस्थात्मक क्वारटाईन करण्यात आलेल्या शाळेतून कोरोना रुग्ण घेऊन जाणाऱ्या रुग्णवाहिकेला बावधन परिसरात अपघात झाला. हा अपघात इतका भयानक होता की रुग्णवाहिका काही अंतर फरफटत गेली होती. मात्र सुदैवाने यात कोणाला गंभीर मार लागला नाही. यात एका छोट्या मुलाचा समावेश होता.

किष्किंदानगर परिसरात लक्षण असणाऱ्या व्यक्तींना शाळेत क्वारटाईन करण्यात आले आहे. त्यांची तपासणी करण्यात येत आहे. यादरम्यान ज्यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांना बालेवाडी परिसरात नेण्यात येत आहे. त्याठिकाणी उपचार केले जात आहे. दरम्यान आज पालिकेची रुग्णवाहिक 12 जणांना घेऊज बालवाडीत येथे जात होती. त्यावेळी बावधन परिसरात शिवप्रसाद हॉटेलसमोर या रुग्णवाहिकेला भीषण अपघात झाला. चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटून हा अपघात झाला असल्याचे सांगण्यात येते. गाडी रस्त्यावर काही अंतर फरफटत गेली. यात हे रुग्ण जखमी झाले. याची माहिती मिळताच नगरसेवक किरण दगडे आणि आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच दुसरी गाडी घेऊन व पीपीई किट घालून कर्मचारी बोलावले. त्यानंतर हे पेशेंत या रुग्णवाहिकेत बालेवाडी येथे पाठविण्यात आले असल्याचे नगरसेवक दगडे यांनी सांगितले. यघटनेमुळे चांगलीच धावपळ उडाली होती.