पोलिसनामा ऑनलाईन टीम – तारापूर औद्योगिक क्षेत्रातील आरती ड्रग्ज कारखान्यात झालेल्या अपघातात दोन कामगार जखमी झाले आहेत. काल रात्री उत्पादन प्रक्रिया सुरू असताना झालेल्या अपघातानंतर याठिकाणी आग लागली होती. कारखान्यातील कामगारांनी आगीवर नियंत्रण मिळविले आहे. ऑपरेटर प्रदीप पाटील व शांताराम जाधव अशी जखमी झालेल्यांची नावे आहेत.
औद्योगिक क्षेत्रातील आरती ड्रग्ज प्लाँट या औषधाचा कच्चा माल बनविणार्या कारखान्यात काल रिअॅक्टरमध्ये रासायनिक प्रक्रिया सुरू होती. त्यावेळी एका रिअॅक्टरमधून दुसर्या रिअॅक्टरमध्ये मध्ये रासायनिक पदार्थ पाठवत असताना रात्री दहाच्या सुमारास अपघात झाला. त्याठिकाणी असलेले दोन ऑपरेटर प्रदीप पाटील व शांताराम जाधव हे जखमी झाले आहेत. जखमींवर खासगी रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले आहे. घटनास्थळी पोलिस आणि अग्निशमक दलाच्या जवानांनी धाव घेतली होती.