सरावादरम्यान 12 वर्षाच्या ‘तीरंदाज’ शिवांगिनीच्या गळ्यात घूसला ‘तीर’

गुवाहाटी : वृत्तसंस्था – आसाममध्ये शुक्रवारपासून खेलो इंडिया गेम्स सुरु होत असून त्याच्या आदल्या दिवशी १२ वर्षाची तीरंदाज शिवांगिनी गोहेन ही जखमी झाली आहे. प्रॅक्टिस करीत असताना तिच्या गळ्यात तीर घुसला असून त्यात ती गंभीर जखमी झाली आहे. प्राथमिक उपचारानंतर तिला अधिक उपचारासाठी हवाई मेडिकल टॅक्सीद्वारे दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हा तीर तिच्या गळ्यात खोलवर अगदी स्वरयंत्रांपर्यंत पोहचला होता. शिवांगिनी ही अनेक शालेय तीरदांजी स्पर्धेत सहभागी झाली असून तिने यापूर्वी अनेक पदकेही पटकाविली आहेत.

शिवांगिनी गोहेन ही खेलो इंडिया गेम्समध्ये सहभागी झालेली नाही. गुवाहाटीपासून ४५० किमी दूर असलेल्या छबुआ येथे हा प्रकार घडला आहे. शिवांगिनी छबुआच्या साई ट्रेनिंग सेंटर मध्ये प्रशिक्षण घेत आहे. प्रशिक्षण सुरु असताना तिच्या सहकाऱ्याचा तीर तिच्या गळ्यात शिरला. हा तीर मानेच्या जवळ खोलवर गेल्याने स्थानिक डॉक्टरांना तो काढता आला नाही. त्यामुळे तिला एअर लिफ्ट करुन दिल्लीला हलविण्यात आले. दिल्लीतील एम्स रुग्णालयात तिच्यावर शस्त्रक्रिया करुन हा तीर काढण्यात आला असून तिची प्रकृती आता सुधारत आहे.

या घटनेची माहिती मिळताच मुख्यमंत्री सोनोवाल यांनी तिला आर्थिक मदतीचे आश्वासन दिले आहे. तसेच साई अ‍ॅकेडमीने तिच्यावरील उपचाराचा सर्व खर्च करण्यात येईल, असे सांगितले आहे.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/