दुर्दैवी ! शिर्डी- जळगाव प्रवासादरम्यान झालेल्या अपघातात पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू तर दुसरा पोलीस जखमी

पोलीसनामा ऑनलाइन :  शिर्डी (Shirdi) येथे बंदोबस्त गेलेले पोलीस कर्मचारी( Police personnel ) बंदोबस्त ड्युटी संपल्यानंतर जळगाव येथे घरी दुचाकीवरून परतत असताना झालेल्या अपघातात (Accident) एकाचा मृत्यू (Death) तर दुसरा जखमी झाला आहे. ही घटना आज (शनिवार) सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास घडली आहे.

सागर तडवी या पोलीस कर्मचाऱ्याचा अपघातात मृत्यू झाला आहे. येथील देवकर अभियांत्रिकी महाविद्यालयाजवळ आज सकाळी 9 वाजता ही घटना घडली. अपघातात दुसरा कर्मचारी जखमी झाला आहे. सागर तडवी आणि त्यांचे सहकारी मित्र शुक्रवारी रात्री दुचाकीने शिर्डी येथून जळगावला येण्यासाठी निघाले होते. सागर तडवी यांचा मृतदेह जिल्हा रुग्णालयात आणला आहे. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. तडवी यांच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.