भरधाव कंटेनरने बैलगाडीला उडविले बैलांसह चौघांचा मृत्यु

उस्मानाबाद : पोलीसनामा ऑनलाइन  – वेळा अमावस्या सण साजरा करुन घराकडे परत जात असताना एका शेतकरी कुटुंबावर काळाने घाला घातला. भरधाव कंटेनरने बैलगाडीला धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात चौघांचा मृत्यु झाला. त्यात दोन बैलांचाही मृत्यु झाला आहे. औरंगाबाद सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर बुधवारी रात्री ७ वाजता हा अपघात घडला. हा अपघात एवढा भीषण होता की लोखंडी बैलगाडीचा अक्षरश: चक्काचूर झाला आहे.

फुनूबाई मंतू पवार (वय ६०), उमा महेश माळवदे (वय ३५), गुजंन माळवदे (वय १२) आणि युवराज दत्तात्रये शेटे (वय ५, सर्व रा़ वडगाव (ज), ता़ कळंब, उस्मानाबाद) अशी मृत्यु पावलेल्यांची नावे आहेत. दत्तात्रय नवनाथ शेटे (वय ३४) हे जखमी असून त्यांच्यावर उस्मानाबाद येथील रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत.

मराठवाड्यात अन्य अमावस्या अशुभ मानली जाते. मात्र, वेळा अमावस्या हा सण म्हणून शेतात जाऊन साजरा केला जातो. त्याप्रमाणे शेटे व माळवदे परिवारातील लोकांनी सण साजरा करुन परत घरी जात होते. ही बैलगाडी गावाकडे जात होती. म्हणून त्यात माळवदे आणि पवार कुटुंबियातील महिला बसल्या. बैलगाडी औरंगाबाद -सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर आली. त्यावेळी वेगाने आलेल्या कंटेनरने तिला जोरात धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, संपूर्ण बैलगाडी तुटून गेली. बैलगाडीचे दोन्ही बैलांचा तसेच तीन महिलांचा जागीच मृत्यु झाला. युवराज शेटे याला ५ वर्षाच्या मुलाचा रुग्णालयात उपचार सुरु असताना त्याचा मृत्यु झाला.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/