आकाशात जमा झालं ‘धूक’, खाली रस्त्यावर धडकले 24 वाहनं, एकाचा मृत्यू तर 12 जखमी

नवी दिल्ली :वृत्तसंस्था – प्रदूषण आणि धुक्यामुळे पंजाबमधील महामार्गावर एक विचित्र अपघात घडला आहे. यामध्ये एका व्यक्तीचा मृत्यू झाला असून जवळपास डझनभर लोकं जखमी झाले आहेत. जखमींना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे तर अपघातस्थळावरील गाडयांना बाजूला सारण्याचे काम सध्या सुरु आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जीरकपुर बठिंडा महामार्गावर सकाळी मोठ्या प्रमाणात पडलेल्या धुक्यामुळे अनेक गाड्या एकमेकांवर आदळून झालेल्या अपघातात एकाच मृत्यू झाला असून 12 जण जखमी झाले आहेत. धुक्यामुळे जवळपास डझनभर गाड्या एकमेकांवर आदळून हा अपघात झाला आहे. सकाळी महामार्गावर एक ट्रॅक्टर ट्रॉली पलटी झाली असता त्यामागोमाग अनेक गाड्या एकमेकांवर आदळून हा भीषण अपघात झाला.

ट्रॉलीखाली दबल्यामुळे एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. दरम्यान, पोलिसांनी जखमींना रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असून ज्या गाडयांचे कमी नुकसान झाले आहे ते निघून गेले असून मोठ्या प्रमाणात नुकसान झालेल्या गाड्या हटवण्याचे काम सुरु आहे.

Visit : Policenama.com