धक्कादायक ! पॅराग्लायडरची दोरी तुटल्याने जमिनीवर पडून दोघांचा मृत्यू

पोलीसनामा ऑनलाईन टीम : मध्यप्रदेश राज्यातील प्रसिद्ध हनुवंतिया जल महोत्सवात बुधवारी एक मोठा अपघात झाला आहे. त्या घडलेल्या अपघातात दोघे ठार झाले आहेत. हे दोन व्यक्ती एका इव्हेंट कंपनीचे कर्मचारी असल्याचे सांगितले जात आहे. हा अपघात बुधवारी सायंकाळी ६ च्या सुमारास घडला आहे. जिल्ह्याधिकाऱ्यांनी या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.

या घटनेमुळे येथील पर्यटकांमध्ये भीतीचं वातावरण आहे आणि मध्यप्रदेशातील गोवा म्हणून प्रसिद्ध असलेल्या या ठिकाणावरील सुरक्षा व्यवस्थेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत.जेव्हा सनसेट इव्हेंट कंपनीचे दोन कर्मचारी पॅराग्लायडिंग करत आकाशात काही वेगळ्या गोष्टी करून पर्यटकांचं मनोरंजन करत होते.

अचानक काही अंतरावर, अधिक उंच गेल्यावर ग्लायडरची दोरी तुटली आणि पॅराशूटही उघडलं नाही. त्याक्षणी त्यामुळे ते वेगाने जमिनीवर येऊन पडले. या घटनेनंतर अनेक लोक त्याक्षणी घटनास्थळी धावत गेले. ग्लायडरमध्ये फसलेल्या दोन कर्मचाऱ्यांना मोठ्या मुश्किलीने ग्लायडरची जाळी कापून काढण्यात आलं. त्यांना लगेच हॉस्पिटलमध्ये रवाना कार्यांत आले. मात्र उपचारापूर्वीच दोघांचा मृत्यू झाला होता.