बस आणि दुचाकीचा भीषण अपघात ; ३ जण जागीच ठार

धुळे : पोलीसनामा ऑनलाइन – बसने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने तीन जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. ही घटना मुंबई-आग्रा महामार्गावरील सरवड टोलनाक्याजवळ घडली.

याबाबत सविस्तर माहिती, मुंबई-आग्रा महामार्गावर धुळेहून शिरपुर कडे जाणाऱ्या बसने दोन दुचाकींना धडक दिली. जोरदार धडक बसल्याने दुचाकीवरील तिघांचा बसच्या चाकाखाली चिरडून मृत्यू झाला. तर एक जण गंभीर जखमी आहे. त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. घटनेची माहिती गावात पसरताच गावातील नागरिकांनी महामार्ग रोखून धरला आहे. त्यामुळे महामार्गावर वाहतूक ठप्प झाली आहे. अपघातातील मृत आणि जखमी चौघेही कापडणे गावातील आहेत. पोलीस घटनास्थळी पोहोचले असून पुढील तपास सुरु आहे.