धुळे : सूतगिरणीच्या कामगारांवर काळाचा ‘घाला’ ; भीषण अपघातात ३ महिला ठार

धुळे : पोलीसनामा ऑनलाइन – शिरपुर येथील सुतगिरणीत काम करणाऱ्या महिला कामगारांच्या रिक्षाला झालेल्या भीषण अपघातात तीन महिला कामगार ठार झाल्या आहेत तर सात कामगार जखमी झाले आहेत. हा अपघात आज सकाळी आठच्या सुमारास मुंबई-आग्रा महामार्गावर गोल्डन फॅक्टरी जवळ झाला.

कल्पनाबाई दगा कोळी (वय ४१ रा.भरतसिंग नगर शिरपूर) यांचा जागीच मृत्यू झाला. तर लक्ष्मीबाई रमेश मराठे (वय ३५ शिरपूर), प्रमिलाबाई तुकाराम अहिरे (वय ६० शिरपूर) यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ज्योती दगा कोळी (वय २० भरतसिंग नगर शिरपूर), सुनील पावरा (वय३५ रा. नेवाली), नरेंद्र दगा मराठे (वय २५ रा. शिरपूर), कविता दगडू अहिरे (वय ३५ रा. शिरपूर), सुदामसिंग पदमसिंग राजपूत (वय ७० रा. शिरपूर) हे गंभीर जखमी झाले आहेत.

शिरपुर येथील सुतगिरणीत काम करणाऱ्या कामगारांना नेण्यासाठी कारखान्याची गाडी येत असते. मात्र, कामगारांची गाडी सुटल्यामुळे कामगार रिक्षामधून (एमएच- १८ -डब्ल्यू – ८७०८) सुतगिरणीत जात होते. मुंबई-आग्रा रोडवरील गोल्डन फॅक्टरी जवळ रिक्षा आली असता भरधाव वेगात जाणाऱ्या मालवहतूक करणाऱ्या कंटेनरची (एमएच -४६- एएफ ७२२८) जोरदार धडक बसली. यामध्ये रिक्षामधील तीन महिलांचा मृत्यू झाला तर सात जण गंभीर जखमी झाले. जखमींवर धुळे येथील रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

दरम्यान, संतप्त जमावाने कंटेनवर दगडफेक केल्याने कंटनेरच्या काचा फुटल्या आहे. महामार्गावर काही वेळ वाहतुक ठप्प झाली होती. अपघाताची माहिती मिळताच परिस्थितीवर नियंत्रण मिळविण्यासाठी पोलीस निरीक्षक शिवाजी बुंधवन व पोलीस कर्मचारी तात्काळ घटनास्थळी रवाना झाले.

आरोग्यविषयक वृत्त

हृदय निरोगी राहण्यासाठी घ्यावा ‘हा’ आहार

या फळांचे ज्यूस घेतल्याने नष्ट होतील गंभीर आजार

महिलांसाठी “योगाचे” महत्व जास्त

३ मिनिटात जाणून घ्या तुमचे हृदय किती तरुण आणि हेल्दी

पावसाळ्यातील व्हायरल फीव्हरपासून असा करा बचाव

‘या’ सवयी ठरु शकतात घाताक, आरोग्याचे होते नुकसान

सिने जगत –

…म्हणून सानिया मिर्झा, वीना मलिक यांच्यात ट्विटरवर ‘जुंपली’, पुढे झालं ‘असं’

‘कलंक’मुळे माझ्या करिअरला ‘कलंक’ : वरूण धवन