home page top 1

अक्कलपाडा धरण वळण रस्त्यावर दुचाकी व कार अपघातात २ ठार

धुळे : पोलीसनामा ऑनलाइन – सुरत-नागपुर महामार्गावर कार व दुचाकी अपघातात एक ठार, एक गंभीर जखमी झाला आहे. सविस्तर माहिती की, सुरतहुन अक्कलपाडा गावाकडुन वळण रस्ताहुन मारुती कार नं. डी एन 09 क्यु. ३७३१ हि धुळ्याकडे येत होती. त्याच वेळी ए एम टी बाईक वर दोन व्यक्ती धुळ्याहुन साक्री कडे जात असताना कार व दुचाकीचा समोरासमोर अपघात झाला यात मोटरसायकल वरील एक जण धडकेत जागीच ठार झाला. तर दुसरा व्यक्ती रक्तबंबाळ स्थितीत रस्त्यावर पडला.

अपघात होताच महामार्गावर काही वेळ वाहतुक ठप्प झाली. जखमीला तातडीने लोकांच्या मदतीने जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले आहे. मोटरसायकलला नंबर प्लेट नसल्याने दोघे व्यक्तींची ओळख पटु शकली नाही. अपघाताची माहिती मिळताच तालुका पोलीस स्टेशनचे पो.नि.दिलीप गांगुर्डे व अन्य पोलीस कर्मचारी घटनास्थळी रवाना झाले आहे.

आरोग्य विषयक वृत्त

पावसाळ्यात आरोग्याची घ्या अशी काळजी

सावधान ! चायनीज फूड खाताय ? हे लक्षात असू द्या

‘यकृत’ निरोगी राहण्यासाठी महत्वाच्या टिप्स

Loading...
You might also like