धुळे : बस आणि मोटरसायकलच्या धडकेत तरुण ठार

धुळे : पोलीसनामा ऑनलाइन –सुरीनदी जवळील सुकवद गावापुढे शिरपुर शिंदखेडा रस्त्यावर दुपारी तीन ते साडेचार वाजेदरम्यान भिषण अपघात झाला. या अपघातामध्ये बस क्रं. एम एच 20 डी 9513 ही शिरपुरहुन शिंदखेडाकडे येत होती. मोटरसायकल टिव्हीएस कं. क्रं. एम एच 18 बी.पी.1248 हि शिंदखेडाहुन सुकवद कडे जाताना मोटरसायकल व बस दोघांत समोरासमोर धडक झाल्याने मोटरसायकलस्वार वर बस आदळल्याने मोटरसायकलस्वार रस्त्याच्या कडेला फेकला गेला त्याच्या डोक्याला मार लागून तो  रक्तबंबाळ झाला होता. दगम्यान डोक्याला जबरदस्त मार बसव्याने तो जागीच ठार झाला.

सदर माहिती शिंदखेडा पोलीसांनी दिली असुन त्यांनी घटनास्थळी तातडीने धाव घेत परिस्थितीवर नियंञण मिळवत वाहतूक पुर्ववत केली. मयताची ओळख पटली असून तो सुकवदला सासुरवाडीला जात होता. मयताचे नाव बालु नामदेव सोनवणे ( भिल ) आहे. अशी माहिती पो.कॉ.मिलींद सोनवणे यांनी दिली. सुकवद गावात अपघात वार्ता पटकन पसरल्यामुळे गावात शोकाकुल वातावरण झाले.

You might also like