धुळे : वाघाडी फाट्याजवळ कंटेनर व इंडिका कार धडकेत १ ठार तर ५ जखमी

धुळे : पोलीसनामा ऑनलाईन – तालुक्यातील सोनगीर गावाजवळील भीषण अपघातात एक महिला ठार झाली. तर अन्य पाच जण जखमी झाले. मुंबई आग्रा महामार्गावर सोनगीर जवळ वाघाडी फाट्यावर अमळनेर कडे जाताना इंडीका गाडीला शिरपुर कडुन येणाऱ्या कंटेनरने धडक दिल्याने इंडीका गाडी मधील एक महीला ठार झाली तर अन्य पाच जण जखमी झाले आहेत. जखमींना तात्काळ जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.

सोनगीर जवळ वाघाडी फाट्यावर इंडीका MH 20. BA 4963 गाडीअमळनेर कडे जात असताना शिरपुर कडुन भरधाव येणाऱ्या कंटेनर GJ 05 BZ 5191 धडक दिल्याने भीषण अपघात झाला. यात इंडीका गाडी रस्त्याच्या बाजूला असलेल्या खड्यात दहा ते पंधरा फुट खोल जाऊ आदळली व फेकली गेली. अपघातात आशाबाई देविदास सुर्यवंशी (भोई ) वय ४१ रा. धडगाव धुळे येथील जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असताना मयत झाल्या. तसेच कैलास मगन सुर्यवंशी वय ४३, सुनंदाबाई कैलास सुर्यवंशी (वय ३८), सुरज कैलास सुर्यवंशी (वय ८ वर्षे), रा. शहादा, तसेच देविदास ओंकार सुर्यवंशी (वय ४५),  कु. किरण देविदास सुर्यवंशी (वय १९) रा. धडगाव,  हे पाच जण जखमी झाले आहेत.

दोन्ही बहिणी आपल्या परीवारासह सोनगीर येथे माहेरी भेटण्यासाठी आल्या होत्या. येथून ते अमळनेर येथे नातेवाईकांना भेटण्यासाठी निघाले होते. महामार्ग रस्ता ओलांडताना अपघात झाला. अन्य जखमींना जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर जखमींना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेत. कंटेनर पोलिसांनी ताब्यात घेतला आहे.

आरोग्यविषयक वृत्त

‘खसखस’मुळं होतात ‘हे’ 5 फायदे, जाणून घ्या

‘ही’ पथ्ये पाळून थायरॉईड अगदी ‘कंट्रोल’मध्ये आणा

‘कोथिंबीर’चं सेवन डोळयांसाठी अत्यंत फायदेमंद, जाणून घ्या

दातांच्या समस्येवर करा  ‘हे’ घरगुती उपाय

वयाच्या पस्तिशीनंतर हाडे मजबूत राहण्यासाठी ‘हे’ उपाय करा

दुधी भोपळा ‘वरदान’ ठरतयं मधुमेह, कावीळ आणि मूत्रपिंडांच्या रूग्णांसाठी, जाणून घ्या

‘व्होडका’त अनेक औषधी गुणधर्म, विविध समस्यांवर लाभदायक !

लग्नाच्या आधी HIV टेस्ट : सरकार बनवणार नवा कायदा