धुळे : लळिंग घाटात ३ वाहनांचा विचित्र अपघात ; ४ ठार तर ३ गंभीर जखमी

धुळे : पोलीसनामा ऑनलाइन – मुंबई आग्रा महामार्गावर बुधावारी दुपारी लळिंग घाटात विचिञ अपघात झाला.या अपघातात तीन जण जागीच ठार झाले आहे.

सविस्तर माहिती की, बुधवारी दुपारी मुंबई आग्रा महामार्गावर लळिंग घाटात मालेगावहुन धुळ्याकडे येणारा ट्रक हा रस्ता दुभाजकावरुन उधळुन येत विरुध्द बाजुस जाणाऱ्या अँप रिक्षा व गोदावरी दुधाचे ट्रे नेणारा ट्रक असा तिहेरी अपघात झाला. यात तीन जण जागीच ठार झाले तर तीन जण गंभीर जखमी झाले आहे. अपघाताची माहिती मिळताच मेहाडी पोलीस सपोनि अभिषेक पाटील घटनास्थळी पोहचले. अन्य लोकांच्या मदतीने जखमीना रुग्ण वाहिकेतुन जिल्हा रुग्णालयात तातडीने उपचारासाठी भरती करण्यात आले. अपघातामुळे महामार्गावरील वाहतुक संथ गतीने सुरु होती. क्रेनच्या मदतीने वाहने बाजुला करण्याचे काम सुरु होते.

आरोग्यविषयक वृत

काळजी घ्या ; कमी झोप घेण्याचा थेट संबंध ‘ब्लड प्रेशर’शी

गर्भपाताची औषधे विकणाऱ्या ऑनलाईन पोर्टलविरोधात एफआरआय

उन्हाळ्यात घामोळ्यांचा त्रास होत असेल तर करा ‘हे’ घरगुती उपाय