भरधाव ट्रकच्या धडकेत विद्यार्थीनीचा जागीच मृत्यू

धुळे : पोलीसनामा ऑनलाइन – भरधाव ट्रकच्या धडकडेत विद्यार्थीनीचा जागीच मृत्यू झाला. ही घटना आज (गुरुवार) सकाळी साकी रोडवरील सिंचन भवन समोर घडली. गुजन देविदास पाटील (वय १४) असे विद्यार्थीनीचे नाव आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, गुंजन सायकलवरून जात असताना तिला सुरतकडे जाणाऱ्या ट्रकने (जी.जे ०१- सी.वाय २६७) जोरदार धडक दिली. धडकेत गुंजनचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. अपघातानंतर ट्रकचालक पसार झाल असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. नागरिकांनी संताप व्यक्त करत काही काळ रास्ता रोको केला. अवजड वाहनांना शहरातून बंदी आहे. तरिही मोठ्या प्रमाणात ही वाहतूक होत असते.

दरम्यान, घटनास्थळी काही काळ तणाव निर्माण झाल्याने मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.