खंडाळ्यात मदुराई एक्सप्रेसला अपघात

लोणावळा : पोलिसनामा ऑनलाईन

शुक्रवारी पहाटे खंडाळा रेल्वे स्थानकाजवळ बंकर इंजिनचे भोगीमध्ये घुसल्याने मदुराई एक्सप्रेस रेल्वेचा अपघात झाला. सुदैवाने कोणतीही जीवित हानीझाली नाही.

[amazon_link asins=’B01EIQSNXC’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’552f787c-80cf-11e8-b502-6fbea83e5ec5′]

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार कुर्ला लोकमान्य टिळक टर्मिनस कडून मदुराई च्या दिशेने जाणारी डाऊन ११०४३ मदुराई एक्सप्रेस या गाडीला पहाटे २.४० वाजण्याच्या सुमारास मध्य रेल्वेच्या खंडाळा रेल्वे स्थानकाच्या जवळ डाऊन लाईन वर अपघात झाला. खंडाळा घाट चढण्यासाठी अधिकची ताकतमिळावी यासाठी या एक्सप्रेस ला कर्जत रेल्वे स्थानकात मागील बाजूस गाडी वर ढकलनारे बंकर इंजिन जोडण्यात आले होते. मदुराई एक्सप्रेस खंडाळा रेल्वेस्थानकात शिरत असतानाच मागून गाडीला ढकलनाऱ्या बंकर इंजिनचा जास्तीचा रेटा गाडीला बसला गाडीची मागील भोगीमध्ये हे इंजिन घुसले. यामुळे याभोगीचं मोठं नुकसान झालं. मात्र सुदैवाने मागच्या भोगीमध्ये लगेज ठेवण्याची जागा असल्याने प्रवाशांपर्यंत हा धक्का पोचला नाही. त्यामुळे यात कोणत्याहीप्रकारची जीवित हानी झाली नाही, किंवा कोणी जखमी देखील झाले नाही. अपघाताची खबर मिळताच लोणावळा पोलीस, रेल्वेचे कर्मचारी, पोलीस दल आणिबचाव पथक घटनास्थळी दाखल झाले आणि बचावकार्य सुरू केले.

अपघातग्रस्त भोगी आणि त्यापुढील अजून एक भोगी घटनास्थळी ठेऊन मदुराई एक्सप्रेसला पुढे काढण्यात आले आहे. आणि सध्या अपघातग्रस्त भोगी तसेचबंकर इंजिन बाजूला काढण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.

घाटात डाऊन लाईन, अप लाईन आणि मिडल लाईन आशा एकूण तीन रेल्वे लाईन असल्याने डाऊन लाईन बंद करून मिडल लाईनने रेल्वेची वाहतूक सुरूठेवल्याने रेल्वे वाहतुकीवर कोणत्याही स्वरूपाचा परिणाम झाला नाही.