नगर-औरंगाबाद महामार्गावरील अपघातात दोन ठार

नगर : पोलीसनामा ऑनलाईन – नगर-औरंगाबाद महामार्गावर ट्रक-स्कॉर्पिओ अपघातात दोन जण जागीच ठार झाले. तर चार जण जखमी झाले आहेत. नेवासा तालुक्यातील हंडीनिमगाव शिवारात आज पहाटे तीनच्या सुमारास हा भीषण अपघात झाला.

दिनार घुमारे , रॉबिन जेम्स (दोघे रा. जालना) ही मयतांची मयतांची नावे आहेत. आदेश गायकवाड, रवींद्र आडबोले, सुमित गायकवाड व कल्याण ठोंबरे (सर्व रा.रामनगर जालना) हे किरकोळ जखमी झाले आहेत. जालना येथून जुन्नर येथे लग्न समारंभासाठी जात असलेल्या स्कॉर्पिओ क्र.(एम.एच.२२ एन.४५६३) च्या चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या माल ट्रॅक क्र.(एम.एच.१२ एल. टी. ९३५९) ला मागील बाजूने जोराची धडक बसली. या अपघातामध्ये स्कॉर्पिओ गाडीचा चक्काचूर झाला आहे. त्यानंतर प्रवाश्यांनी स्कॉर्पिओतील जखमींना बाहेर काढून नेवासा फाटा येथील खाजगी रुग्णालयात दाखल केले.

याप्रकरणी स्कॉर्पिओ चालक कल्याण ठोंबरे याच्याविरोधात नेवासा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास हेडकॉन्स्टेबल सुनील जरे करीत आहे.

आरोग्यविषयक वृत्त –

You might also like